साम टिव्ही ब्युरो
कायमच बोल्ड आणि सुपरहॉट आउटफिटने प्रकाशझोतात राहणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद.
बिग बॉस ओटीटी वरच्या उर्फीच्या प्रवासाने तिला नवीन दिशा मिळाली आहे.
उर्फी जावेद उत्तर प्रदेशातील लखनौची आहे.
मुंबईत लहानाची मोठी झालेली उर्फी आता २४ वर्षाची आहे.
लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या उर्फीने मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे.
उर्फीने बडे भैया की दुल्हनिया, बेपनाह, ये रिश्ता क्या कहलाता है आणि कसोटी जिंदगी की या मालिकांमध्ये अभिनय केला आहे.
सोशल मीडियावर उर्फीच्या फॅशनस्टाईलची तूफान चर्चा आहे.
उर्फी बिनधास्त आहे. अनेकदा तिने तिच्या मुलाखतीत मी बिनधास्तपणे हे करते असे सांगितले आहे.
उर्फीच्या अतरंगी स्टाईलचा विशेष असा चाहतावर्ग आहे. अनेक आर्टीस्ट तिच्या हटके स्टाईलचे कौतुक करतात.