Famous Actor Death saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा

Famous Actor Passes Away : मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे.

अभिनेत्याने ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली.

मनोरंजन सृष्टीतून एक तेजस्वी तारा हरपला. प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. 'Miami Vice', 'Top Gun' आणि 'Back To The Future' यांमधून आपल्या अभिनयाने वेड लावणारे अभिनेते जेम्स टोलकन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. यामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. TMZ ने दिलेल्या माहितीनुसार, जेम्स टोलकन यांचे शुक्रवारी निधन झाले.

जेम्स टोलकन यांचे न्यूयॉर्कमधील सारानाक लेक येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाचे अधिकृत कारण अद्याप समोर आले नाही. जेम्स टोलकन यांच्या पश्चात त्यांची पत्नी, पारमली वेल्स असा परिवार आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. चाहते आणि कलाकार मंडळींनी त्यांच्यावर श्रद्धांजली वाहिली.

जेम्स टोलकन कोण?

'Back To The Future' आणि 'Top Gun' यांमधील भूमिकांमध्ये जेम्स टोलकन यांना खूप प्रसिद्धी मिळाली. अभिनेत्याचा जन्म २० जून १९३१ रोजी मिशिगनमधील कॅल्युमेट येथे झाला होता. आपल्या सुरुवातीच्या काळात, त्यांनी ॲरिझोना येथे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर कोरियन युद्धादरम्यान अधिकृतपणे सैन्यात भरती झाले. मात्र तब्येतीमुळे ते तेथून निघून आले. त्यानंतर त्यांनी 'बॅचलर ऑफ आर्ट्स'ची पदवी मिळवली. त्यांना 'The Three Sisters' या चित्रपटात भूमिका मिळाली. त्यानंतर ३ वर्षांनी त्यांना 'Stiletto' या चित्रपटात दुसरी भूमिका मिळाली. त्यानंतर अभिनेते अनेक चित्रपटांमध्ये झळकले.

जेम्स टोलकन हे मोठ्या पडद्यावर शेवटचे 'Tom Wilson: Humbly Super Famous' या माहितीपटात दिसले. तसेच ते 'Bone Tomahawk' या चित्रपटात एका पियानोवादकाच्या भूमिकेत दिसले होते. आपल्या कारकिर्दीच्या काळात त्यांनी अनेक टिव्ही शो देखील केले. त्यांच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT