Jackie Shroff Sends Gifts To Vidya Balan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jackie Shroff And Vidya Balan : जॅकी श्रॉफकडून विद्या बालनला शानदार गिफ्ट, आनंद गगनात मावेना

Jackie Shroff Sends Gifts To Vidya Balan : जग्गू दादाने अभिनेत्रीला सोन्याचा हार किंवा रत्नजडीत हार न देता पर्यावरण पूरक तिला हार गिफ्ट केलेला आहे. अभिनेत्रीने त्यागिफ्टचा फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेला आहे.

Chetan Bodke

अभिनेत्री विद्या बालनचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. ती कायमच इन्स्टाग्रामवर चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. सध्या अभिनेत्री विद्या बालन जग्गू दादाने दिलेल्या गिफ्टमुळे चर्चेत आली आहे. जग्गू दादाने अभिनेत्रीला सोन्याचा हार किंवा रत्नजडीत हार न देता पर्यावरण पूरक तिला हार गिफ्ट केलेला आहे. अभिनेत्रीने त्यागिफ्टचा फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेला आहे.

अभिनेत्रीने इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केलेली आहे, त्यामध्ये तिने गळ्यात लॉकेट म्हणून छोटं झाडाचं रोपटं वेअर केलेलं आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री लॉकेटबद्दल सांगत आहे. अनेकदा जग्गू दादा कॅमेऱ्यासमोर झाडाचं छोटं रोपटं घेऊन स्पॉट झाले आहेत. त्यांच्या त्या निर्णयाचे कौतुक सर्वत्र झाले होते. व्हिडिओमध्ये अभिनेत्री म्हणाली, "माझ्या गळ्यात असलेलं झाडाचं रोपटं गिफ्ट म्हणून जॅकी श्रॉफ म्हणजेच भिडूने दिलं आहे.

Vidya Balan Insta Story

"मला त्यांनी दिलेलं गिफ्ट प्रचंड आवडलं आहे. या झाडातून मला ऑक्सिजन मिळतोय. यामुळे मी एक चांगला आणि दीर्घ श्वास घेऊ शकत आहे. भिडूने दिलेले गिफ्ट मला प्रचंड आवडलं असून गिफ्ट म्हणून ही संकल्पना खूप चांगली आहे. मला त्यांनी दिलेलं गिफ्ट आवडलंय." कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी विद्या सध्या सोशल मीडियावरील रिल्समुळे चर्चेत आली आहे. ती कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

तिला इन्स्टा रिल्स बनवताना एक वेगळाच आनंद मिळतो, असं तिने एका रिलमध्ये सांगितले. ज्या गोष्टीमध्ये मला आवड आहे, त्या गोष्टी मी आवर्जुन करते. मी करत असलेल्या गोष्टींना चांगला प्रतिसाद मिळतो. मला आवड आहे म्हणून प्रामाणिकपणे अभिनयाप्रमाणेच मी रिल्सही करते, अशी प्रतिक्रिया अभिनेत्रीने दिली आहे. विद्या शेवटची 'दो और दो प्यार' चित्रपटामध्ये दिसली होती. तिच्यासोबत चित्रपटामध्ये प्रतीक गांधी, इलियाना डिक्रुझ आणि सेंथिल राममूर्ती हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

SCROLL FOR NEXT