Arvind Dhanu Saam Tv
मनोरंजन बातम्या

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेते अरविंद धनू यांचं निधन

वयाच्या ४७ वर्षा त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - मराठी चित्रपट व मालिकांमध्ये काम करणारे लोकप्रिय अभिनेते अरविंद धनू (Arvind Dhanu) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ४७ वर्षा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरविंद धनू यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहेत. अरविंद धनू यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

हे देखील पाहा -

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेमुळे अरविंद धनू प्रकाशझोतात आले. या मालिकेत त्यांनी शालिनीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. अरविंद धनू यांच्या पश्चात पत्नी असा परिवार आहे. रात्री उशिरा त्यांच्यावर माहीम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद धनू हे मुंबईतील एका कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांची प्रकृती खालावली. पण यादरम्यान त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झालं. ‘लेक माझी लाडकी’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘क्राईम पेट्रोल’ अशा काही मालिकांबरोबरच त्यांनी ‘एक होता वाल्या’ या मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : मोठी संधी मिळेल; 5 राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार, वाचा बुधवारचे राशीभविष्य

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

SCROLL FOR NEXT