KRK news  saam tv
मनोरंजन बातम्या

छातीत दुखू लागल्याने KRK रुग्णालयात दाखल; वादग्रस्त ट्विटमुळे मुंबई पोलिसांनी केली होती अटक

अभिनेता कमाल खान उर्फ KRKने खळबळजनक ट्विट केल्यामुळे त्याच्या चांगल्याच अडचणी वाढल्या आहेत. त्याने २०२० मध्ये एक वादग्स्त ट्विटसाठी अटक करण्यात आली आहे.

सूरज सावंत

Kamal R Khan News : अभिनेता कमाल खान उर्फ KRKने खळबळजनक ट्विट केल्यामुळे त्याच्या चांगल्याच अडचणी वाढल्या आहेत. त्याने २०२० मध्ये एक वादग्स्त ट्विटसाठी अटक करण्यात आली आहे. मात्र, काल पासून मालाड पोलिसांच्या अटकेत असलेल्या कमाल खानच्या (KRK) छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अभिनेता कमाल शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कमाल आर खान (Kamal R Khan) रोज असे काही ट्विट किंवा विधाने करतो, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा होत असते. कमाल रशीद खानला २०२० मध्ये मालाड पोलिसांनी त्याच्या एका वादग्रस्त ट्विट प्रकरणी अटक केली. त्याने २०२० मध्ये ट्विटरवर लव्ह जिहादशी संबंधित मजकूर लिहिला आणि पोस्ट केला. त्याच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर वातावरण चांगलंच तापलं होतं. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्यामुळे त्याच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. आज कमाल खानला छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, काल मालाड पोलिसांनी 2020 मध्ये ट्विट प्रकरणी कमलला अटक केली. या ट्विटमध्ये कमलने लव्ह जिहादशी संबंधित मजकूर लिहिला आणि पोस्ट केला. आज कमलला बोरिवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याच्या वकिलाने त्याच्या जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता, त्यावर आता 2 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donut Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा एगलेस टेस्टी चॉकलेट डोनट्स; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसामुळे धुळे शहरातून वाहणारी पांझरा नदीला आला पूर

भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला जमीन मंजूर

Rain Alert: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे, पुणे- नाशिकसह ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Late Night Cravings: रात्री अचानक तुम्हालाही लागते का भूक? या गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं

SCROLL FOR NEXT