Shaitaan Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shaitaan Twitter Review: ब्लॅक मॅजिक- सस्पेन्स असलेल्या 'शैतान'चा 'फर्स्ट डे फर्स्ट शो' दणक्यात, ट्वीटरवर कौतुकाचा वर्षाव

Shaitaan Review: हॉरर आणि थ्रिलर 'शैतान' चित्रपटाला सध्या सोशल मीडियावर दमदार प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच काही प्रेक्षकांनी चित्रपट पाहिल्यानंतर एक्सवर ट्वीट करत चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

Chetan Bodke

Shaitaan Twitter Review

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Actor Ajay Devgn) आणि आर. माधवनचा (Actor R Madhvan) 'शैतान' चित्रपट (Shaitaan Movie) अखेर आज रिलीज झालेला आहे. महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. टीझर आणि ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. हॉरर आणि थ्रिलर 'शैतान' चित्रपटाला सध्या सोशल मीडियावर दमदार प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच काही प्रेक्षकांनी चित्रपट पाहिल्यानंतर एक्सवर ट्वीट करत चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. (Bollywood)

अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिका स्टारर हा चित्रपट ८ मार्चला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. सध्या ह्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटाबद्दल एक युजर सांगतो, "जादूटोणा, सस्पेन्स आणि गडद जगावर आधारित हा चित्रपट आहे. अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिकाने चित्रपटामध्ये खूप दमदार अभिनय केला आहे. चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाला मी पाच पैकी चार स्टार देतो." (Bollywood Film)

चित्रपटाबद्दल तरण आदर्श सांगतात, "जादूटोणा, सस्पेन्स आणि गडद जगावर आधारलेले चित्रपटाचे कथानक आहे. कथानकात येणारे ट्वीस्ट खूप दमदार आहे. कथानक, चित्रपटाची बॅकग्राऊंड म्युझिक, स्टारकास्टचा दमदार अभिनय प्रेक्षकांना खुर्चीसोबत खिळवून ठेवतो. लेखकांनी चित्रपटाचे कथानक खूप सुंदर रित्या प्रेक्षकांसमोर मांडले आहे. उत्तम चित्रपट आहे." (Social Media)

चित्रपट नक्कीच थिएटरमध्ये ब्लॉकबस्टर ठरेल, अशी चर्चा सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये होत आहे. त्यासोबतच हा चित्रपट लवकरात लवकर १०० कोटींच्या क्लबमध्ये दमदार एन्ट्री करेल, असे अनेक युजर्स बोलत आहेत. ६० ते ६५ कोटींच्या बजेटमध्ये निर्मित झालेला हा चित्रपट पहिल्याच ओपनिंग डेला १० ते १२ कोटींची कमाई करण्याची शक्यता आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

SCROLL FOR NEXT