Aishwarya-Abhishek Divorce Rumors Instagram
मनोरंजन बातम्या

Aishwarya-Abhishek Divorce Rumors : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यात दुरावा? 'त्या' पोस्टला लाईक केल्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

Abhishek Bachchan And Aishwarya Rai News : पुन्हा एकदा अनंत- राधिकाच्या लग्नापासून अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर अभिषेक- ऐश्वर्या वेगवेगळे झाल्याची चर्चाही सुरू आहे.

Chetan Bodke

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्यातील घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. अशाही अफवा सुरु आहेत की, ते दोघंही घटस्फोट घेणार आहेत. पण असं असलं तरीही दोघांकडून घटस्फोटाच्या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. अशातच पुन्हा एकदा अनंत- राधिकाच्या लग्नापासून अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर अभिषेक- ऐश्वर्या वेगवेगळे झाल्याची चर्चाही सुरू आहे. लग्नामध्ये ते एकत्र दिसले नव्हते.

गेल्या काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर अभिषेकने एक घटस्फोटसंबंधित पोस्ट लाईक केली आहे. ही पोस्ट लेखिका हीना खंडेलवाल हिने शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये लिहिलेले होते की, "घटस्फोट घेणं ही साधी गोष्ट नाही. प्रत्येकाला आपलं आनंदी कुटुंब पाहायला आवडतं. प्रत्येकाला आपल्या कुटुंबासोबत पाहिलेले स्वप्न पूर्ण करायचे आहेत. वृद्धापकाळात कोणाला आपल्या लाईफ पार्टनरचा हात पकडून रस्ता ओलांडायचा, असा कोण विचार करत नाही? पण जे आपल्याला हवं आहे, ते केव्हाच होत नाही. " असं तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. मुख्य म्हणजे, ह्या पोस्टला अभिषेकने लाईक केलेले आहे.

अभिषेकने ह्या पोस्टला लाईक करताच, त्यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होत आहे. अभिनेत्याने ही पोस्ट लाईक केल्यामुळे सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. ती पोस्ट लाईक केल्याचा पुरावा लेखिका हिना खंडेलवाल हिने इन्स्टा स्टोरी शेअर करत दिलेला आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याचं नातं खराब झाल्यामुळे त्यानं ही पोस्ट लाईक केल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना बसला मोठा धक्का! एकाच झटक्यात भाव गगनाला भिडले, काय आहेत नवे दर?

Maharashtra News Live Update: ....अन्यथा मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांचा व शासकीय वाहनांचा लिलाव करणार- रविकांत तुपकर

Cardamom Benefits : सलग १५ दिवस वेलची खाल्ल्याने शरीरात होतील 'हे' ६ महत्त्वाचे बदल

Career Horoscope : आजपासून ‘या’ ५ राशींचं नशीब पालटणार! कामाचा ताण होईल कमी अन् पैशांचा पाऊस पडणार

Earphone side effects: इअरबड्स काढल्यानंतरही कानात शिट्टीसारखा आवाज ऐकू येतोय? शरीराचा हा इशारा अजिबात दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT