John Abraham And Bipasha Basu Love Story Saam Tv
मनोरंजन बातम्या

John Abraham Birthday: जॉनला एक चूक पडली महागात; जॉन-बिपाशाच्या अधुरी प्रेम कहाणी मागील नेमकं कारण काय?

Chetan Bodke

John Abraham And Bipasha Basu Love Story

एकेकाळी बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार ॲक्शनमुळे चर्चेत राहणारा आणि लाखोंचा चाहतावर्ग असणाऱ्या अभिनेता जॉन अब्राहमचा आज वाढदिवस आहे. जॉनच्या सिनेकारकिर्दिला लवकरच वीस वर्षे होणार आहेत. तो जितका आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहिला आहे, तितकाच आपल्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत आहे. जॉन काहीवर्ष बिपाशा बासूसोबत रिलेशनशिपमध्ये होता, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. दोघांच्याही रिलेशनची सोशल मीडियावर चर्चा जोरदार रंगली. पण त्या दोघांचं नेमकं कोणत्या कारणामुळे नात्यामध्ये दुरावा आला हे आपण आज जाणून घेणार आहोत...

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमित सक्सेना दिग्दर्शित ‘जिस्म’ चित्रपट २००३ मध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये जॉन आणि बिपाशा बासू दोघेही एकत्रित दिसले होते. या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानच हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सेटवर आधी एकमेकांची मैत्री झाली होती. आणि नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ते दोघेही ९ वर्ष रिलेशनमध्ये होते. ते दोघेही लग्न करणार अशी सर्वत्र चर्चा होत असताना एकमेकांमध्ये मतभेद निर्माण झाले.

जॉन अब्राहमच्या एका चुकीनंतर जॉन आणि बिपाशाचे मार्ग वेगळे झाले. अनेक अवॉर्ड शोसह अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये जॉन आणि बिपाशा एकत्र दिसायचे. कायमच एकत्र स्पॉट होणाऱ्या कपलची ब्रेकअपची बातमी ऐकून अनेकांना धक्काच बसला. २०१४ मध्ये न्यू इयरच्या पार्टीमध्ये, जॉनच्या एका चुकीमुळे एकमेकांमध्ये मतभेद निर्माण झाले.

जॉनने ट्विट केले की, ‘यावर्षी तुमच्या आयुष्यामध्ये, खूप प्रेम आणि आनंद येऊदे... लव्ह जॉन आणि प्रिया अब्राहम’ जॉनने चुकून हे ट्विट केले होते. हे ट्विट समोर येताच एकच गोंधळ उडाला. या ट्विटनंतरच जॉन आणि बिपाशा यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता.

पुढे बिपाशाने करण सिंग ग्रोव्हरला २०१६ मध्ये जोडीदार म्हणून निवडलं तर जॉनने प्रिया रूंचाल हिच्यासोबत २०१४ मध्ये लग्नगाठ बांधली. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT