Albattya Galbattya Natak Saam tv
मनोरंजन बातम्या

Albattya Galbattya Natak: कल्याणच्या नाट्यगृहाची अवस्था पाहून कलाकार संतापले; 'अलबत्या गलबत्या' कलाकारांचा व्हिडिओ व्हायरल

Albattya Galbattya Natak: कल्याणच्या आचार्य प्रल्हाद अत्रे नाट्यगृहातील गैरसोयींविरोधात ‘अलबत्या गलबत्या’ कलाकारांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला.

Shruti Vilas Kadam

Albattya Galbattya Natak: कल्याणमधील आचार्य प्रल्हाद अत्रे रंगमंदिर येथील गैरसोयी आणि अव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लोकप्रिय मराठी नाटक अलबत्या गलबत्याच्या कलाकारांनी नाट्यगृहातील समस्यांवर भाष्य करणारा व्हिडिओ तयार केला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आता या नाट्यगृहात प्रयोग बंद करण्याची वेळ आल्याचा इशारा कलाकारांनी दिला आहे.

कल्याण शहरातील प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या आचार्य प्रल्हाद अत्रे नाट्यगृहात अनेक मराठी नाटकांचे नियमित प्रयोग होतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून येथे असलेल्या सुविधांबाबत कलाकार आणि प्रेक्षकांकडून गंभीर तक्रारी समोर येत आहेत. ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाच्या टीमने तयार केलेल्या व्हिडिओमध्ये नाट्यगृहातील इलेक्ट्रिक स्पार्क, बंद पडणारे एसी, अस्वच्छ स्वच्छतागृह आणि इतर गैरसोयी अधोरेखित करण्यात आल्या आहेत.

अभिनेत्री श्रद्धा हांडे यांनी सांगितले की, या समस्यांबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. लॉकडाऊननंतर नाट्यगृह दुरुस्तीसाठी काही काळ बंद ठेवण्यात आले होते. त्या काळात नेमकी कोणती कामे करण्यात आली आणि खर्च केलेला निधी कुठे गेला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कलाकारांच्या म्हणण्यानुसार, नाट्यगृहात वारंवार इलेक्ट्रिक स्पार्क होत असल्याने चार ते पाच वेळा प्रयोग थांबवावे लागले. त्यामुळे प्रेक्षक आणि कलाकार दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून या समस्या कायम असूनही कोणतीही सुधारणा झालेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून शिवसेना उबाटा देखील आक्रमक झाली आहे. पक्षाचे पदाधिकारी उमेश बोरगावकर यांनी कोट्यवधी रुपये खर्च करूनही नाट्यगृहातील मूलभूत सुविधा व्यवस्थित नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. दुरुस्तीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT