Abir Gulaal BOYCOTT Saam Tv
मनोरंजन बातम्या

vaani kapoor-fawad khan: माझ्याकडे शब्द नाहीत...; पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अबीर-गुलाल बॉयकॉट, वाणी-फवादची भावनिक पोस्ट

vaani kapoor fawad khan Post: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने सोशल मीडियावर आपला शोक व्यक्त केला. तर, पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने देखील या हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले.

Shruti Vilas Kadam

vaani kapoor fawad khan Post: २० एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बाईसरण व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आणि २० हून अधिक पर्यटक जखमी झाले. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने सोशल मीडियावर 'गटेड' (gutted) असे लिहून आपला शोक व्यक्त केला. तर, पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने देखील या हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले.

वाणी कपूरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर 'गटेड' असे लिहून पहलगाम हल्ल्याबद्दलचा शोक व्यक्त केला. वाणीने काळ्या बॅकग्राउंडवर तुटलेल्या हृदयाच्या इमोजीसह पोस्ट करत, मी सुन्न झाले आहे, पहलगाममध्ये निष्पाप लोकांवर हल्ला पाहिल्यापासून माझ्याकडे शब्द नाहीत. मी खूप दुःखी आहे. माझ्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबांसोबत आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. वाणी कपूर आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांचा चित्रपट ९ मे रोजी प्रदर्शित होत आहे. दरम्यान, या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता असल्यामुळे या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मिडीयावर केली जात होती. तर, वाणी चित्रपटाचे प्रमोशन करत असल्यामुळे अनेक लोक तिला देशद्रोही म्हणत ट्रोल करत आहेत. फवाद खाननेही त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यात लिहिले आहे की, 'पहलगाममधील भयानक हल्ल्याच्या बातमीने खूप दुःख झाले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडियावर 'अबीर-गुलाल बॉयकॉट' ट्रेंड सुरू झाला होता, ज्यात काही लोकांनी बॉलिवूड कलाकारांच्या मौनावर टीका केली होती. तथापि, वाणी कपूर आणि फवाद खानने आपल्या पोस्टद्वारे या हल्ल्याबद्दलचा शोक व्यक्त केला, यानंतर आता 'अबीर-गुलाल चित्रपटावर बंदी घातली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT