Tridha Choudhury Wedding Instagram
मनोरंजन बातम्या

Tridha Choudhury Wedding: ‘आश्रम’ फेम बबिता लवकरच अडकणार लग्नबंधनात, खुद्द अभिनेत्रीनेच केला खुलासा...

Tridha Choudhury Interview: ‘आश्रम’ फेम अभिनेत्री सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

Tridha Choudhury Wedding

‘आश्रम’ फेम अभिनेत्री सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा होत आहे. नुकतंच अभिनेत्रीने वेबसाईटला मुलाखत देत, खुलासा केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कलकत्ता टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्रिधा चौधरीने सांगितले की, “मी इंडस्ट्रीमध्ये असलेल्याच एका व्यक्तीला डेट करीत आहे. पण आम्ही दोघेही त्याविषयी कोणाला काहीही सांगणार नाहीत. त्याविषयीची माहिती गुपित ठेवली आहे. आमच्या रिलेशनबद्दल मी तुम्हाला फार काही सांगू शकत नाही. पण इतके सांगू शकते की, आम्ही दोघेही खूपच आनंदित आहोत. पुढच्या वर्षी आम्ही गुरुद्वारामध्ये लग्न करणार आहोत.”

सोबतच यावेळी त्रिधाने मुलाखतीमध्ये आम्हाला लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचे असल्याचे सांगितले. आम्हाला आमच्या नात्यामध्ये गुपित ठेवायला आवडते, असं सुद्धा ती मुलाखतीत म्हणाली. दरम्यान, त्रिधा २९ वर्षीय असून ती लवकरच एका बंगाली वेबसीरीजमधून चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. त्रिधाने आतापर्यंत बॉलिवूड, बंगाली आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर २०१६ मध्ये अभिनेत्रीने ‘स्टार प्लस’वरील ‘दहलीज’ या सिरीयलमधून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये डेब्यु केले.

खरंतर त्रिधा एम एक्स प्लेयरवरील ‘आश्रम’ या वेबसीरीजमुळे प्रचंड चर्चेत आली होती. त्या वेबसीरीजमध्ये बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन देत चांगलीच प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर त्रिधा ‘बंदिश बँडिट्स’ या ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवरील वेबसीरीजमध्येही दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT