Aamne Samne Marathi natak Controversy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aamne Saamne: 'नाण्याची दुसरी बाजू...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर मंगेश कदम आणि लीना भागवत यांचं स्पष्टीकरण

Aamne Saamne: ‘आमने सामने’ नाटकातून रोहन गुजर आणि केतकी पालव बाहेर पडले आहेत. आता मंगेश कदम आणि लीना भागवत यांनी मानधनवाढीच्या वादावर स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली.

Shruti Vilas Kadam

Aamne Saamne: मराठी रंगभूमीवरील ‘आमने सामने’ या लोकप्रिय नाटकातून अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी पालव यांना अचानक बाहेर काढल्याच्या चर्चेला आता नवं वळण मिळालं आहे. मानधनवाढीच्या मुद्द्यावरून नाटकातून बाहेर पडावं लागल्याचा दावा रोहन आणि केतकी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केला होता. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश कदम तसेच अभिनेत्री लीना भागवत यांनी आपली बाजू मांडली आहे. मानधनवाढीची मागणी एकदा नव्हे, तर तिसऱ्यांदा करण्यात आली होती, असं लीना भागवत यांनी स्पष्ट केलं.

‘तिसऱ्यांदा मानधनवाढ मागितली’

लीना भागवत यांनी सांगितलं की, त्या आणि मंगेश कदम हे या नाटकात कलाकार असण्यासोबतच निर्मातेही आहेत. रोहन गुजर आणि केतकी पालव यांच्या व्हिडीओनंतर आलेल्या प्रतिक्रिया त्यांनी पाहिल्या. त्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करण्यासाठी त्यांनी हा व्हिडीओ केला. लीना यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला कलाकारांनी मानधनवाढीचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी नाटकाचे प्रयोग सुरू नव्हते. तरीही त्यांनी ही मागणी मान्य केली. त्यानंतर नाटक चांगलं चालू लागल्यानंतर पुन्हा मानधनवाढीचा प्रस्ताव आला. दुसऱ्यांदा मानधन वाढवल्यानंतर कलाकारांना आणखी काही अपेक्षा आहेत का, असं विचारण्यात आलं होतं. त्यावेळी आणखी काही अडचण नसल्याचं सांगण्यात आल्याचा दावा मंगेश कदम यांनी केला. पण, चार ते पाच महिन्यांतच पुन्हा मानधन वाढवण्याच्या अपेक्षा कलाकारांनी केल्या. लीना भागवत यांनी पुढे सांगितलं की, मानधनवाढीच्या प्रस्तावासोबत दरवर्षी मानधन वाढवून देण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली होती. मात्र, दरवर्षी अशी वाढ करणं निर्माते म्हणून त्यांना शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी ही मागणी मान्य केली नाही.

रोहन-केतकी यांची नाराजी काय?

दुसरीकडे, रोहन गुजर आणि केतकी पालव यांनी नाटकातून अचानक बाहेर पडावं लागल्याची खंत व्यक्त केली होती. रोहन गेल्या सात ते आठ वर्षांपासून या नाटकात काम करत होता, तर केतकी साडेपाच वर्षांपासून नाटकाचा भाग होती. दोघांनी मिळून अनेक प्रयोग केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, १८ ऑक्टोबर रोजी रवींद्र नाट्यमंदिर येथे प्रयोग झाल्यानंतर झालेल्या बैठकीत त्यांना हा तुमचा शेवटचा प्रयोग असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे प्रेक्षकांचा निरोप घेण्याची किंवा शेवटचा प्रयोग साजरा करण्याची संधी मिळाली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. रोहनने मानधन हा नाटकातून वेगळं होण्यामागील मुद्दा असल्याचं सांगितलं. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी संवाद व्हायला हवा होता, असं त्याचं म्हणणं होतं.

‘यापुढे व्हिडीओ करणार नाही’

मंगेश कदम आणि लीना भागवत यांनी निर्माते म्हणून कलाकारांना अपेक्षित मानधन देणं शक्य नसल्यास त्यांच्याकडून काम करून घेणं योग्य नसल्याचं सांगितलं. त्यामुळे वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यापुढे या विषयावर कोणतीही पोस्ट किंवा व्हिडीओ करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Healthy Drink For Women: 30 वर्षावरील महिलांसाठी 5 हेल्दी ड्रिंक, आरोग्य राहील ठणठणीत

Custard apple seed removal: सिताफळाच्या बिया काढायचा कंटाळा येतोय? फक्त गर काढण्यासाठी ही सोपी ट्रिक वापरून तर बघा

Maharashtra News Live Update: सह्याद्रीच्या रक्षणासाठी राज ठाकरे मैदानात, आज कर्जतमध्ये सभा

EPFO Latest News : EPFO चा मोठा निर्णय! ₹१५,००० ची मर्यादा आता ₹२५,०००? तुमच्या पगारावर काय परिणाम होणार?

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, पुढचे ७ दिवस पाणी उकळून प्या, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT