Aamir Khan saam tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan : "हिंदीत का बोलू? हा महाराष्ट्र आहे..."; मतदानानंतरचा आमिर खानचा 'तो' VIDEO व्हायरल

Aamir Khan Statement On Marathi Language : आमिर खानने मतदान केल्यानंतर मराठीत प्रतिक्रिया दिली. त्यातील त्याचे एक वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तो नेमकं काय बोला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मतदान करून आल्यावर आमिर खानने मीडियाला प्रतिक्रिया दिली.

आमिरने मीडियाशी मराठीत संवाद साधला.

महापालिका निवडणुकीचे मतदान काल (15 जानेवारी 2026) ला पार पडले आहे. आज (16 जानेवारी 2026) ला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.सर्व सामान्य जनता, कलाकार मंडळींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली आहे. तसेच बॉलिवूड सेलिब्रिटींचे मतदानानंतर प्रतिक्रिया देतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तो जनतेला मतदान करण्याचे आव्हान देताना दिसत आहे. सध्या निवडणुकीसोबत मराठी हिंदी-मराठी भाषेचा वाद पाहायला मिळत आहे. अशात मतदान केल्यावर आमिर खान मीडियाशी बोलला. तो म्हणाला, "तर नक्की या आणि vote द्या..." त्यानंतर मीडियाने आमिरला हिंदीत बोलण्याची विनंती केली. तेव्हा तो म्हणाला, "हिंदी में? यह महाराष्ट्र है भाई!" ('हिंदीत का बोलू? हा महाराष्ट्र आहे.) आमिर खानचा हा संवाद तुफान व्हायरल होत आहे.

आमिर खानने निवडणुकीच्या नियोजनाविषयी तसेच व्यवस्थेविषयी कौतुक केले. तसेच वारंवार मतदान करण्याची आव्हान दिले. मराठी भाषेसाठी, महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधू (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) एकत्र आले आहे. त्यामुळे यंदा कोण बाजी मारणार?, निवडणुकीचा निकाल काय लागणार? याकडे सामान्य जनतेचे लक्ष लागून आहे.

आमिर खान कायम आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. आमिर खानचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. किरण रावसोबत घटस्फोटानंतर आमिर खान आता गौरी स्प्रॅटला डेट करत आहे. आमिर खानने 2024 पासून गौरीला डेट करायला सुरुवात केली आणि आता 2025 मध्ये त्यांनी आपले नाते अधिकृत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरच्या घरी बनवा चविष्ट गाजरची झणझणीत भाजी; एकदा खाल तर खातच राहाल

Maharashtra News Live Update: आंबेनळी घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच

Maharashtra Politics: आमदाराला 20 कोटींच्या ऑफर; संजय राऊतांच्या दाव्यानंतर काँग्रेस नेत्यानं केली ऑफरची पोलखोल

Monsoon Footwear Design: पावसाळ्यात सँडल किंवा शूज नाही, या ७ प्रकारचे फुटवेअर ठरतील कम्फर्टेबल आणि बेस्ट

हिंदूंना लुटणारं सरकार सत्तेत; रामाचं धनुष्य चोरणाऱ्यांची लंका 'मशाली'नं जाळणार, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT