Aamir Khan  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aamir Khan : 'महाभारत' चित्रपटात आमिर खान कोणत्या भूमिकेत दिसणार? स्वतः दिली हिंट

Aamir Khan-Mahabharat : अभिनेता आमिर खानने आपला ड्रीम प्रोजेक्ट 'महाभारत' विषयी मोठे अपडेट दिले आहेत. त्याला चित्रपटात कोणती भूमिका करायला आवडेल, याचा खुलासा आमिरने केला आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतो. सध्या तो त्याचा ड्रीम प्रोजेक्ट 'महाभारत'मुळे चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. आता या चित्रपटासंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच 'महाभारत' चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार आहे. आमिर खानने त्याला चित्रपटात कोणती भूमिका करायला आवडेल याचा खुलासा देखील केला आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.

एका मिडिया मुलाखतीत आमिर खान म्हणाला की, "महाभारत हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पण हा प्रोजेक्ट खूप मोठा आहे. त्यामुळे मी याकडे खूप लक्ष देऊन काम करत आहे. माझा आगामी चित्रपट रिलीज झाल्यावर मी महाभारत प्रोजेक्टवर काम करेन. मी माझं बेस्ट देईन." पुढे आमिरला 'महाभारत' चित्रपटातील भूमिकांबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, "मला स्वतःला श्रीकृष्णाची भूमिका करायला नक्कीच आवडेल. ही भूमिका खूप आकर्षित आणि स्ट्राँग आहे. "

आमिर खानने सांगितल्यानुसार, 'महाभारत' चित्रपटाचे दोन भाग बनणार आहेत. 'महाभारत' हा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाही आहे. आता 'महाभारत' चित्रपटात आमिर खान कोणत्या भूमिकेत दिसणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सितारे जमीन पर

आमिर खान सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'सितारे जमीन पर'च्या कामामध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 20 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिर खानचा 'तारे जमीन पर' चित्रपट 2007 साली रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. 'सितारे जमीन पर' हा 'तारे जमीन पर'चा सीक्वेल आहे. 'सितारे जमीन पर'मध्ये आमिर खानसोबत जिनिलिया देशमुख देखील झळकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Face Mask: चमकदार आणि नितळ त्वचेसाठी घरच्या घरी फेस मास्क कसं बनवायचं?

Randeep Hooda: 'आज मी बाबा झालो...'; रणदीप हुड्डाच्या घरी गोंडस मुलीचे आगमन, सोशल मीडियावर केली खास पोस्ट

Maharashtra Live News Update : मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मोर्चा

LPG Cylinder eKYC: फक्त २ मिनिटांत करा एलपीजी गॅस सिलिंडरची ईकेवायसी ; स्टेप बाय स्टेप करा फॉलो; अन्यथा मिळणार नाही सब्सिडी

स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकच्या डॉ. अमोल पाटलांबद्दल धक्कादायक माहिती समोर, ९६ महिलांचे...

SCROLL FOR NEXT