Ira Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ira Khan :आमिर खानच्या लेकीचं मराठमोळं केळवण; होणाऱ्या नवऱ्यासाठी घेतला उखाणा, VIDEO होतोय व्हायरल

Ira Khan Wedding: बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aamir Khan Daughter Ira Khan Pre Wedding Functions:

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आमिर खानच्या घरी लगीसराई सुरु झाली आहे. काही महिन्यांपूर्वी आयरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे यांचा साखरपुडा झाला होता. साखरपुड्यानंतर येत्या जानेवारी महिन्यात हे दोघेही लग्न करणार आहेत.

नुकताच नुपूर शिखरे आणि आयरा खानच्या केळवणाचा कार्यक्रमा पार पाडला. आयराने सोशल मीडियावर केळवणाचे फोटो शेअर केले आहेत.

केळवणासाठी आयरा आणि नुपूर दोघेही खूप सुंदर दिसत होते. नुपुरने कुर्ता घातला होता तर आयराने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. आयराने नाकात नथ आणि चंद्रकोर लावून मराठमोळा लूक केला होता. आयराच्या केळवणाला अभिनेत्री मिथिला पालकरदेखील उपस्थित होती. त्याचसोबत घरातील इतर सदस्य उपस्थित होते.

आयराने इन्स्टाग्रामवर केळवणाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यात आयरा उखाणा घेताना दिसत आहे. व्हिडिओत आयराला उखाणा घेण्यासाठी घरचे आग्रह करतात. त्यानंतर आयरा उखाणा घेते. 'मला मराठी येत नाही, पण पोपयसाठी मी कधीच नाही म्हणत नाही'. असा उखाणा ती घेते. यावेळी आयरा नुपुरला ज्या नावाने हाक मारते तेच नाव उखाण्यात घेते.

आयराच्या या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. आयरा आणि नुपूर ३ जानेवारी २०२४ रोजी लग्नगाठ बांधणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT