Aamir Khan on Sonam Wangchuk Saam tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan on Sonam Wangchuk: '3 इडियट्स'मधील रांचो सोनम वांगचुक होते का? आमिर खानने केला मोठा खुलासा

Aamir Khan on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर आमीर खानने चिंता व्यक्त केली. तसेच '३ इडियट्स'मधील रांचो हे पात्र त्यांच्यावर आधारित नसल्याचाही गैरसमज त्याने स्पष्ट केला.

Shruti Vilas Kadam

Aamir Khan on Sonam Wangchuk: प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि अभियंता सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणामुळे देशभरात चर्चा रंगली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत सामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत अनेकजन चिंता व्यक्त करत आहेत, आता बॉलिवूड अभिनेता आमीर खाननेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोनम वांगचुक यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर सकारात्मक तोडगा निघावा, अशी अपेक्षा व्यक्त करत '३ इडियट्स' चित्रपटातील रांचो हे पात्र त्यांच्यावर आधारित नसल्याचे स्पष्ट केले.

अलीकडेच ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या संवादादरम्यान आमीर खानला सोनम वांगचुक यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्याने '३ इडियट्स' चित्रपटातील रांचो हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याचा समजही फेटाळून लावला.

आमीर म्हणाला, 'हा एक गैरसमज आहे. आम्ही '३ इडियट्स' बनवत होतो, तेव्हा मला सोनम वांगचुक यांच्याबद्दल माहितीही नव्हती. दिग्दर्शक राजकुमार हिरानी, लेखक अभिजात जोशी किंवा मी आमच्यापैकी कोणालाही त्यावेळी त्यांच्याबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे रांचो हे पात्र त्यांच्यावर आधारित असल्याचे म्हणणे योग्य नाही.'

'काही दिवसांपूर्वी अभिनेता ओमी वैद्य याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला होता. त्यात त्याने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत, त्यांना अशा अवस्थेत पाहायचे नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर '३ इडियट्स' मधील पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याच्या चर्चा रंगल्या पण ते फक्त एक पात्र होते.' असे तो म्हणाला.

आमीर खानने मात्र या चर्चेला पूर्णविराम देत स्पष्ट केले की, 'सोनम वांगचुक यांच्या कार्याचा आदर करण्यासाठी 'रांचो' हे पात्र त्यांच्यावर आधारित असणे आवश्यक नाही. त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले काम प्रेरणादायी असून त्यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहोत. लवकरच सकारात्मक मार्ग निघेल, अशी आशा आहे. त्यांनी आपल्या आरोग्याला प्राधान्य द्यावे आणि स्वतःची काळजी घ्यावी.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Knee Damage : गुडघे कमजोर करत आहेत रोजच्या 'या' ५ सवयी; वेळीच ओळखा धोका, नाहीतर...

7 Types Of Veg Rice: रोजचा साधा भात खाऊन कंटाळा आलाय? ट्राय करा सोप्या आणि चवदार 7 व्हेज राईस रेसिपीज

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

Restaurant Price Hike : खवय्यांच्या खिशाला बसणार फटका! हॉटेल - रेस्टॉरंटमधील जेवण महागणार; किती पैसे मोजावे लागणार? वाचा

Gold : सोनं-चांदी खरेदीदारांसाठी खूशखबर! चांदी ८००० ने स्वस्त, सोन्याची किंमतही घसरली; पाहा आजचे दर

SCROLL FOR NEXT