Aamir Khan saam Tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan: हातात हात अन्...; पहिल्यांदाच आमिर खान गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत स्पॉट, पाहा व्हिडिओ

Aamir Khan: बॉलिवूड अभिनेता आमिर खान नुकताच चीनमध्ये आपल्या कथित गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत स्पॉट झाला असून, त्या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले आहेत.

Shruti Vilas Kadam

Aamir Khan: बॉलिवूड अभिनेता आमिर खान नुकताच चीनमध्ये आपल्या कथित गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत स्पॉट झाला असून, त्या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये आमिर आणि गौरी मकाऊ फिल्म फेस्टिव्हलमध्ये एकत्र दिसत आहेत. या भेटीनंतर दोघांच्या नात्याबद्दल चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

फोटोमध्ये आमिर साध्या आणि आरामदायक कपड्यांमध्ये दिसत आहे, तर गौरीही कॅज्युअल अवतारात दिसून आली. सोशल मीडियावर ही जोडी पाहून अनेक युजर्सनी आश्चर्य व्यक्त केलं आहे आणि काहींनी त्यांच्या नात्याबद्दल चांगल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काही युजर्सनी मात्र या भेटीवर मिश्कील आणि टीकात्मक टिप्पण्या देखील केल्या.

गौरी स्प्रॅट ही एक प्रसिद्ध लेखिका आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी व्यक्ती आहे. तिचं आणि आमिरचं नाव गेल्या काही महिन्यांपासून जोडले जात आहे, मात्र दोघांनीही या नात्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र अशा सततच्या एकत्र दिसण्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना अधिक बळ मिळत आहे.

आमिर खान सध्या चित्रपटांपासून थोडा वेळ दूर राहत वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष देत आहे. तो वेळोवेळी सामाजिक कार्य, कौटुंबिक कार्यक्रम आणि खासगी भेटींमुळे चर्चेत राहतो. चीनमधील त्याचा हा दौरा वैयक्तिक असल्याचं बोललं जातं असून, आगामी काही दिवसांमध्ये तो पुन्हा एका नव्या चित्रपटासाठी तयारी सुरू करणार असल्याची माहितीही समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT