Aamir Khan and gauri Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan Wedding: 'मिस्टर परफेक्शनिस्ट'च्या घरी लग्नाची लगबग; आमीर खान 2 आठवड्यात विवाह बंधनात अडकणार

Aamir Khan Wedding: किरण राव आणि रीना दत्ता यांच्यानंतर आमिर खान गौरी स्प्राटसोबत लग्न करणार आहे. 5 जुलै रोजी साध्या पद्धतीने विवाह होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Shruti Vilas Kadam

Aamir Khan Wedding: बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. रीना दत्ता आणि किरण रावनंतर आता आमिर खान तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमिर खानने स्वत: या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खान आणि गौरी स्प्राट यांचा विवाह 5 जुलै रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणजे हा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत होणार असल्याचे आमिरने स्पष्ट केले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले की, दोघेही भव्य विवाहसोहळा टाळून नोंदणीकृत विवाह करणार आहेत.

आमिर म्हणाला, "आम्ही घरीच रजिस्टर मॅरेज करणार आहोत. या सोहळ्याला फक्त आमचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहतील. आम्हाला लग्न साधेपणानेच करायचे आहे." त्याच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये आणि बॉलिवूडमध्ये या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आमिरने आणखी एका मुलाखतीत लग्नाच्या बातम्यांना दुजोरा देताना सांगितले की, "होय, या सर्व बातम्या खऱ्या आहेत. आमचे लग्न 5 जुलै रोजी होणार आहे. सध्या लग्न ही माझी सर्वोच्च प्राथमिकता नसली तरी आम्ही आमच्या नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी तयार आहोत."

दरम्यान, लग्नाच्या तयारीमुळे आमिरने काही काळासाठी कामातून ब्रेक घेतल्याचेही सांगितले जात आहे. विवाहानंतर तो पुन्हा दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या '3 इडियट्स' चित्रपटाच्या सिक्वेलवर काम सुरू करण्याची शक्यता आहे. या सिक्वेलमध्ये रँचो, फरहान आणि राजू यांच्या आयुष्यातील नव्या टप्प्याची कथा पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.

आमिर आणि गौरी यांची पहिली भेट सुमारे 25 वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळी त्यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र कालांतराने दोघांचा संपर्क तुटला. तब्बल 23 ते 24 वर्षांनंतर आमिरची चुलत बहीण नुझहत खान हिच्यामुळे त्यांची पुन्हा भेट झाली. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि गेल्या दोन वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. आता 5 जुलै रोजी दोघेही लग्न करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Knee Damage : गुडघे कमजोर करत आहेत रोजच्या 'या' ५ सवयी; वेळीच ओळखा धोका, नाहीतर...

7 Types Of Veg Rice: रोजचा साधा भात खाऊन कंटाळा आलाय? ट्राय करा सोप्या आणि चवदार 7 व्हेज राईस रेसिपीज

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

Restaurant Price Hike : खवय्यांच्या खिशाला बसणार फटका! हॉटेल - रेस्टॉरंटमधील जेवण महागणार; किती पैसे मोजावे लागणार? वाचा

Gold : सोनं-चांदी खरेदीदारांसाठी खूशखबर! चांदी ८००० ने स्वस्त, सोन्याची किंमतही घसरली; पाहा आजचे दर

SCROLL FOR NEXT