Aamir khan wedding SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aamir khan wedding : आमिर खान तिसऱ्यांदा चढला बोहल्यावर; गौरी स्प्रॅटसोबत बांधली लग्नगाठ, पहिला PHOTO आला समोर

Aamir Khan - Gauri Spratt Are Now Officially Married : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा लग्न बंधनात अडकला आहे. लग्न सोहळ्याचा पहिला फोटो समोर आलाय.

Shreya Maskar

आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्न बंधनात

गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत नवीन संसाराला सुरुवात

आमिर खान आणि गौरी स्प्रॅटच्या लग्न सोहळ्यातील पहिला फोटो आला समोर

आमिर खान आणि गौरी स्प्रॅटने दोन वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर लग्नगाठ बांधली. आमिर खानने मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी एक खाजगी समारंभ करून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. या लग्न सोहळ्याला त्यांचे जवळचे मित्र, कुटुंबीय आणि त्यांच्या आधीच्या लग्नांमधील मुले उपस्थित होती.

spicesocial यांनी आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात सर्व कुटुंब दिसत आहे. तसेच आमिर खान आणि गौरी स्प्रॅट एकत्र बसलेले दिसत आहेत. आमिर लग्नाच्या कागदपत्रांवर सही करताना दिसत आहेत. गौरीचा मुलगा दोघांच्या मध्ये उभा आहे. तसेच आमिरचा मुलगा देखील बाजूला उभा आहे. आमिर खान आणि गौरी स्प्रॅट दोघे एकत्र खूपच सुंदर आणि आनंदी दिसत आहेत.

आमिर खान आणि गौरी स्प्रॅटचा लग्नाचा फोटो प्रंचड व्हायरल होत आहे. यावर चाहते भरभरून कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. चाहते त्यांना नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आमिर आणि गौरी यांच्या नात्याची सुरुवात २०२४ मध्ये झाली. ते जवळपास वर्षभर लाँग-डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर मार्च २०२५ मध्ये आपल्या ६० व्या वाढदिवशी आमिरने माध्यमांना सांगितले की गौरी ही त्याची जोडीदार आहे.

आमिरचे वैयक्तिक आयुष्य

आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्तासोबत 1986 मध्ये झाले असून त्यांचा घटस्फोट 2006 मध्ये झाला. त्यानंतर आमिर खानने चित्रपट निर्माती किरण रावसोबत लग्न केले. यांचा घटस्फोट 2021 मध्ये झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना फूड पॉइझनिंग; जेवणानंतर मुलांना होऊ लागल्या उलट्या

शिक्षणमंत्र्याचा राजीनाम्यानंतर मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; लोकसभेत सादर मांडणार नवं विधेयक

पंढरपूर मंदिर कॉरिडॉरचं काम कधी सुरू होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी अपडेट

मराठी माणसानं पुन्हा दिल्ली जिंकली, अभिजीत भिडला, दिल्लीश्वर झुकले, मराठी मोडेन पण वाकणार नाही

प्रधानांचा राजीनामा, महाराष्ट्रात भूकंप?फडणवीस, शिंदेंना दिल्लीत बोलावणं, फडणवीस शिक्षणमंत्री होणार, राऊतांचा दावा

SCROLL FOR NEXT