Madhurani Gokhale - Pramod Prabhulkar News : मराठी टीव्ही अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चासंबंधीच्या वृत्ताचे तिचे पती प्रमोद प्रभुलकर यांनी खंडन केले आहे. दोघेही वेगळे होणार असल्याच्या शक्यतांचे वृत्त चुकीचे आहे आणि आमच्या वैवाहिक आयुष्यात काहीच अडचणी नाहीत, असे प्रमोद प्रभुलकर यांनी साम टीव्ही डिजिटलशी बोलताना सांगितलं.
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आणि पती निर्माता प्रमोद प्रभुलकर या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या. मात्र, या सर्व अफवा असल्याचे प्रमोद प्रभुलकर यांनी सांगितलं.
आमच्या वैवाहिक जीवनात काहीच अडचणी नाहीत. सोशल मीडियावरील अशा चर्चा सपशेल चुकीच्या आहेत. मी आणि मधुराणी आम्ही एकत्रच आहोत. त्यामुळे अशा चर्चांना काहीच अर्थ नाही, असेही प्रमोद यांनी स्पष्ट केले.
आम्ही दोघेही एकमेकांसोबत आनंदी आहोत. निराधार वृत्त प्रसिद्ध करून आमच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावू नये, असेही प्रमोदने सांगितले. (TV Industry News)
सोशल मीडियावर आमचे फोटो नसणं याचा अर्थ आमच्या नात्यात काही प्रॉब्लेम्स आहेत, असं होत नाही, असंही प्रभुलकर यांनी स्पष्ट केलं.
मधुराणी ही टीव्ही अभिनेत्री आहे. प्रमोद चित्रपट निर्माता असून त्याची अभिनय प्रशिक्षण अकादमी देखील आहे. काही दिवसांपूर्वी मधुराणीनं अभिनय प्रशिक्षण अकादमीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता.
या दोघांनी काही वर्षांपूर्वी एक अभिनय प्रशिक्षण अकादमी सुरू केली होती. विविध क्षेत्रांतील वाढलेल्या कामामुळे मला संस्थेच्या दैनंदिन कामकाजात लक्ष घालता येत नाही, या कारणास्तव समन्वयाने मी राजीनामा दिला आहे, अशी माहिती मधुराणीने पोस्टद्वारे दिली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.