Aai Kuthe Kay Karte Serial Update Saam TV
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karte Update: फोन पाहताच वीणाच्या पायाखालची जमीनच सरकली; नेमकं काय आहे त्या मेसेजमध्ये ?

Aai Kuthe Kay Karte Latest Update : वीणाच्या येण्याने अनिरुद्ध संजनाशी अजूनच विचित्र वागू लागला आहे.

Pooja Dange

Arundhati Saw Veena Get Scared: 'आई कुठे काय करते' मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सध्या या मालिकेतील कथा सुद्धा रंजक वळणावर आहे. वीणाच्या येण्याने अनिरुद्ध संजनाशी अजूनच विचित्र वागू लागला आहे. तर वीणाला अनिरुद्धचे वागणे योग्य वाटत आहे आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेच्या पुढील भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शची झाला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती, वीणा आणि सुलोचना दिसत आहेत. चला तर मा जाणून घेऊया या तिघी एकत्र काय करत आहेत ते. (Latest Entertainment News)

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ऐक कुठे काय करते'च्या प्रोमोमध्ये अरुंधती, वीणा आणि सुलोचना पाणी पुरी खाताना दिसत आहेत. इतक्यात वीणाचा फोन वाजतो. मेसेज वाजताच तिच्या हातून फोन पडतो आणि ती घाबरी-घुबरी होते. आजूबाजूला कोणाला तरी शोधू लागते.

अरुंधती तिचा खाली पडलेला फोन उचलते ती मेसेज वाचणार इतक्यात वीणा तिच्या हातून फोन काढून घेते. वीणा इतकी घाबरते की ती अरुंधती आणि सुलोचनाला घरी जाण्यासाठी जबरदस्ती करू लागते. वीणाला असं पाहून सुचलोचना आणि अरुंधती तिची काळजी करू लागतात.

हा प्रोमो पाहिल्यानंतर वीणाच्या भूतकाळाविषयी सर्वांना उत्सुकता निर्माण होणार आहे. तिचा भूतकाळ काय असेल तिला कोणाची भीती वाटत असेल, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. वीणाला केळकर कुटुंबाची साथ मिळेल का ? अरुंधती तिची मदत करेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला आई कुठे काय करते मालिकेच्या येणाऱ्या भागात मिळतील.

'आई कुठे काय करते'मध्ये सध्या काय सूरू आहे ?

अरुंधती तिचा ऑस्ट्रेलिया दौरा करून परत आली आहे. तिने आशुतोषसाठी वटपौर्णिमेचे पूजा देखील केली. तर देशमुखांकडे संजना वटपौर्णिमा करण्यास नकार देते. वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी संजनाचा वाढदिवस होता. सर्व देशमुख कुटुंबीयांनी तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी-चिंचवडमध्ये निर्माणाधीन इमारतीला लागली आग

शिक्कामोर्तब! ठाकरे बंधूंची अखेर युती; मुंबईसह या ६ महापालिका निवडणुका मनसे-शिवसेना एकत्र लढणार

Schezwan Chakli Recipe : चकलीला द्या चायनिज तडका, १० मिनिटांत बनवा कुरकुरीत शेजवान चकली

Purandar Airport: विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाचा तिढा सुटला; शेतकऱ्यांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबईत मोठा राडा; CSMT स्टेशनबाहेर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, रस्ता अडवला

SCROLL FOR NEXT