Gauri Kulkarni Got Engagement? Saam TV
मनोरंजन बातम्या

Gauri Kulkarni Engagement: यशच्या गौरीचा झाला साखरपुडा? 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी

Gauri Kulkarni Photo: गौरी कुलकर्णीने तिच्या इंस्टाग्राम फोटो पोस्ट केले आहेत.

Pooja Dange

Gauri Kulkarni Flaunt Diamond Ring:

'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील पात्र प्रेक्षकांना त्यांच्या घरातीलच आहेत असे वाटते. त्यामुळे जरी ती पात्र मालिकेत नसली तरी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. असाच एक पात्र म्हणजे गौरीचं.

अभिनेत्री गौरी कुलकर्णी आता या मालिकेत नाही. परंतु तिच्या पोस्टने ती नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी शेअर केली आहे.

गौरी कुलकर्णीने तिच्या इंस्टाग्राम फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये गौरी तिच्या हातातील हिऱ्यांची अंगठी फ्लॉन्ट करत आहे. तसेच तिने लिहिले आहे की, 'इट्स हॅपनिंग'.

गौरीचा २३ सप्टेंबरला वाढदिवस होता. तर वाढदिवशीच गौरीने ही आनंदाची बातमी शेअर केली. 'इट्स हॅपनिंग' म्हणजे नेमकं काय? हे अद्याप तिने सांगितलेले नाही. परंतु गौरीचा साखरपुडा झाला असल्याची सर्वत्र चर्चा आहे.

गौरीच्या कुलकर्णीच्या या पोस्टवर अनेक सेलेब्रिटी कमेंट करत तिचे अभिनंदन करत आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवे, अंविता फलटणकर, राधा सागर, नंदिता पाटकर या कलाकारांनी गौरीच्या पोस्टवर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. (Celebrity)

गौरीच्या चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत 'बीड मुलगी कुठली सून होणार' हे विचारले आहे. नेटकऱ्यांना गौरीच्या जोडीदाराविषयी जाणून घेण्याची खूप उत्सुकता असल्याचे पोस्टवरील कमेंटमधून दिसून येत आहे.

गौरीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच तिच्या जीवनातील सर्वात मोठी गोष्टविषयी सर्वकाही सांगण्यासाठी थोडा वेळ मागितला आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT