Aapadi Thapadi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aapadi Thapadi Movie: 'धमाल फॅमिलीची कमाल पाहणार का? मुक्ता आणि श्रेयसचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर 'आपडी थापडी' हा मराठी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे(Mukta Barve) आणि अभिनेता श्रेयस तळपदे(Shreyas Talpade) नेहमीच आपल्या नाविन्यपूर्ण कलाकृतींमुळे ओळखले जातात. आपल्या अभिनयाच्या उत्तम कामगिरींमुळे चाहत्यांमध्ये ते नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी या कलाकारांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाचे नाव 'आपडी थापडी' असून चित्रपटात मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे आणि श्रेयस तळपदेसोबत नंदू माधव, संदीप पाठक, खूशी हजारे आणि नवीन प्रभाकर हे कलाकार दिसणार आहेत. ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे नुकतेच सोशल मीडियावर पोस्टर रिलीज करण्यात आला आहे.

'आपडी थापडी'या सिनेमाच्या दिग्दर्शन आनंद करीरने केलं असून के सायलेंटच्या केसी पांडे यांनी चित्रपटाची निर्मीती केली आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाची 'फॅमिलीचा सिनेमा बघा फॅमिली बरोबर' अशी टॅगलाईन आहे. या चित्रपटाचे पोस्टर आऊट झाल्यानंतर प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

श्रेयस तळपदेने मराठी मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. त्याने हिंदी सिनेमांमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. 'बाजी' आणि 'पोस्टर बॉईज' या सिनेमांनंतर जवळपास सात वर्षांनी श्रेयस तळपदे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्याच्याबरोबर मुक्ता बर्वेसारखी अष्टपैलू अभिनेत्री असल्याने 'आपडी-थापडी' नक्कीच प्रेक्षकांसाठी परिवारिक मेजवानी ठरणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी दसऱ्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Organize : स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्याचे ५ सर्वोत्तम मार्ग, जाणून घ्या

Aadhaar-Pan Linking: हे काम आताच करा, अन्यथा ३१ डिसेंबरला येणार नाही पगार

Mumbai–Pune Highway Accident : मित्रांसोबत लोणावळ्याला निघाला, पण वाटेत कुत्र्याने घात केला, मुंबई-पुणे हायवेवर तरूणाचा मृत्यू

Pawan Singh Wife: 'मी एक तुच्छ महिला...'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने मागितली आर्थिक मदत, सोशल मीडियावर शेअर केला क्यूआर कोड

लाडकी बहिण योजनेसाठी ekyc कशी कराल ? कोणते कागदपत्रे लागतात?

SCROLL FOR NEXT