Gautami Patil Dance Show In Beed Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Viral Video: नादच खुळा! बायकोच्या बड्डेला गौतमीच्या डान्सचं गिफ्ट, भाजप आमदाराचीही कार्यक्रमाला हजेरी

आष्टी तालुक्यातील निमगाव बोडखा येथील एका व्यक्तीने आपल्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त चक्क गौतमी पाटीलचा डान्स शो ठेवला होता. यावेळी शेकडो लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाला भाजपचे आमदार सुरेश धस हे सुद्धा उपस्थित होते.

Chetan Bodke

Gautami Patil Dance Show In Beed Birthday: महाराष्ट्रातील प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील हिची क्रेझ काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. गौतमीचा डान्स म्हटलं की, फक्त एकाच जिल्ह्यातील माणसं न येता, अवघ्या महाराष्ट्रातून तिच्या कार्यक्रमाला लोकं उपस्थित राहतात. अनेकदा तिच्या कार्यक्रमाला काही वाद झाल्यामुळे तिचा कार्यक्रम सुद्धा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. चक्क एका पठ्ठ्यानं बायकोच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा डान्स ठेवला आहे.

कोणताही कार्यक्रम असला की, गौतमीच्या डान्सचे हल्ली आयोजन केले जाते. एका पठ्ठ्याने तर बायकोच्या वाढदिवसाला एक जबरदस्त ट्रीक केली. आपल्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त थेट गौतमी पाटीलच्याच डान्सचे आयोजन केले होते. पठ्ठ्या इतक्यावरच थांबला नाही तर, गौतमीच्या हाताने त्याने केकही कापला. त्यामुळे पंचक्रोशीतच नाही तर, राज्यात या वाढदिवसाची जोरदार चर्चा सुरु आहे.

आष्टी तालुक्यातील निमगाव बोडखा या गावामधील किरण गावडे यांची पत्नी प्रगती गावडे यांचा वाढदिवस होता. सध्या प्रगती गावडे यांच्या वाढदिवसाची अवघ्या महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे. किरणनं आपल्या पत्नीला हटक्या पद्धतीने गिफ्ट देत थेट नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रगती गावडे यांच्या वाढदिवसाला गौतमी पाटील हिच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

या अनोख्या वाढदिवसाला भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील मुख्य हजेरी लावली होती. यावेळी तरुणाईंनी देखील मोठी गर्दी केली होती. प्रगती गावडे यांचा वाढदिवस पंचक्रोशीतच नाही तर अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे. या वाढदिवसाला गौतमीने मराठमोळ्या पद्धतीने वेश परिधान करुन आली होती.

गौतमी पाटीलच्या हस्ते केक कापल्यानंतर गौतमी पाटीलचा स्टेज शो झाला. यावेळी गौतमी पाटील यांच्या अदाकारी पाहण्यासाठी पंचक्रोशीतून लोकांनी गर्दी केली होती. गौतमीच्या प्रत्येक गाण्यावर आणि तिच्या अदाकारीवर गावकरी फेटे उडवत प्रतिसाद देत होते. स्टेजच्या बाजूने यावेळी तुंबड गर्दी दिसून येत होती. प्रेक्षकांच्या नुसत्या टाळ्या आणि शिट्ट्यांच्या आतषबाजीने परिसर गजबजला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

SCROLL FOR NEXT