Urvashi Rautela viral Video Instagram @urvashirautela
मनोरंजन बातम्या

Urvashi Rautela: ऋषभ पंतविषयी विचारताच उर्वशीच्या चेहऱ्याचा रंगच उडाला; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल

Urvashi Rautela Viral Video: उर्वशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

Pooja Dange

Urvashi Rautela-Rishabh Pant: अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला आणि भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू विकेट-किपर आणि फलंदाज ऋषभ पंत नेहमीच चर्चा असतात. ऋषभ पंत आणि उर्वशीविषयी सोशल मीडियावर देखील नेहमीच बोलले जाते.

ऋषभचा अपघात झाला होता तेव्हा उर्वशी आणि तिच्या आईने सोशल मीडियावर पोस्ट करत ऋषभ बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली होती. ऋषभ आणि उर्वशी नेहमीच चर्चेचा विषय असतात. सध्या उर्वशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशीला ऋषभविषयी विचारण्यात आले. त्यावर उर्वशी काय म्हणले ते पाहूया.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका पत्रकाराने उर्वशीला ऋषभविषयी काही प्रश्न विचारले. पत्रकाराने ऋषभविषयी विचारताच उर्वशी बावरून गेली. तिला काय बोलावे हे सुचत नव्हते.

पत्रकाराने उर्वशीला विचारले की, ऋषभच्या अपघातानंतर तुम्ही त्यासाठी पोस्ट केली होती. तर आता तुमचं काही बोलणं झालं आहे. त्याची ताब्येत कशी आहे तुम्हाला माहित आहे का? यावर उर्वशी म्हणाली, तुम्हाला हवाय फक्त टीआरपी,टीआरपी, टीआरपी... आणि ते मी होऊन देणार नाही. असे बोलून उर्वशीने त्या प्रश्नाला टाळले. उर्वशीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ऋषभ पंतचा डिसेंबर 2022 मध्ये भीषण कार अपघात झाला होता. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पाठीला, हाताला, गुडघ्याला, पायाला खूप दुखापत झाली होती. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. पंत दुखापतीतून सावरत असला तरी तो पुन्हा कधी मैदानात खेळताना दिसेल माहित नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Pune Accident: जेजुरीत अपघाताचा थरार! पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना ट्रकने चिरडलं, ४ जणांचा मृत्यू

गरमा गरम चहासोबत खा पोहा कचोरी, घरी बनवण्याची सोपी रेसिपी

Kidney stone symptoms: सतत पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका; किडनी स्टोन झाल्यावर शरीर देत असलेली ही 8 लक्षणं ओळखा

Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात हत्याकांडाचा थरार, डोक्यात दगड घालून तरुणाला जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT