Big Boss SAAM TV
मनोरंजन बातम्या

Big Boss : 70 च्या दशकातील सुपरस्टार, ज्याला बिग बॉसनं दिली होती प्रति एपिसोड 3.5 कोटींची ऑफर, तरीही नकार

Shreya Maskar

बिग बॉस 18 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते बिग बॉसची आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाचे बिग बॉस सीझन सलमान खान होस्ट करणार आहे. या पर्वात कोणते स्पर्धक पाहायला मिळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहेत. बिग बॉसचे यंदाचे पर्व अधिक रंजक करण्यासाठी बिग बॉस अनेक मोठ्या कलाकारांना ऑफर देत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार,त्यांनी दिशा वकानीला देखील बिग बॉसची ऑफर दिली होती पण तिने ती नाकारली.

बिग बॉस प्रत्येक पर्व खास होण्यासाठी नवीन आणि मोठ्या कालाकरांना ऑफर देत असते. यापूर्वी देखील बिग बॉसने अनेक मोठ्या कालाकरांना ऑफर दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 70च्या दशकातील एका सुपरस्टारला त्या काळात बिग बॉसने ऑफर दिली होती. हा सुपरस्टार दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेते राजेश खन्ना हे आहेत. बिग बॉसच्या निर्मात्यांनी तब्बल 3.5 कोटी रुपयांची ऑफर बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना यांना दिली होती. ही ऑफर प्रति एपिसोडसाठी होती. मात्र त्यांनी एवढी मोठी ऑफर नाकारली.

बिग बॉसच्या निर्मात्यांनी राजेश खन्ना यांचे मन वळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. राजेश खन्ना हे त्यावेळी करिअरच्या कठीण टप्प्यातून जात होते, तरी देखील त्यांना बिग बॉसची ऑफर नाकारली. राजेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने अनेकांना भुरळ घातली होती. त्यांनी करिअरमध्ये अनेक चढउतारांचा सामना करावा लागला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Classical Language Status : जाहलो खरेच धन्य...! मराठी भाषेला अभिजात दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: शरद पवारांचा एकाच वेळी भाजप-अजित पवारांना धक्का, डाव टाकताच बडे नेते लागले गळाला!

Marathi News Live Updates : रत्नागिरीतील महिलांना पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून मोबाईल

Abdul Sattar News : पन्नास खोके एकदम ओके; अब्दुल सत्तारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, कुठं घडला प्रकार? VIDEO

Maharashtra Politics: अजित पवार गटाला 40 जागा, शिंदे - भाजप किती जागांवर लढवणार निवडणूक? काय आहे अमित शहांचा फॉर्म्युला? वाचा...

SCROLL FOR NEXT