Chetan Bodke
बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी आपले प्राण कॅन्सरमुळे गमावले आहे.
मनोरंजन क्षेत्रातील प्रतिभावान आणि सुप्रसिद्ध अभिनेतेही कॅन्सरच्या विळख्यात आले आहेत.
दिग्गजांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात आणि एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे.
आज सकाळी बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे सर्व्हायकल कॅन्सरमुळे निधन झाले आहे.
अभिनेता इरफान खानला २०१८ मध्ये न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचे निदान झाले. अभिनेत्याचे २९ एप्रिल २०२० रोजी निधन झाले.
बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांना २०१८ मध्ये ल्युकेमियाचे निदान झाले होते. या आजारामुळे ३० एप्रिल २०२० रोजी निधन झाले.
नेते आणि अभिनेते विनोद खन्ना यांना २०१६ मध्ये मूत्राशयाच्या कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. वर्षभरानंतर २७ एप्रिल २०१७ रोजी त्यांचे निधन झाले.
सुपरस्टार राजेश खन्ना यांना जुलै २०११ मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते. यामुळे १८ जुलै २०१२ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस दत्त यांना १९८०मध्ये स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. वर्षभरानंतर ३ मे १९८१ रोजी मृत्यू झाला.
अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता फिरोज खान यांना २००८ मध्ये कर्करोगाचे निदान झाले. वर्षभरानंतर २७ एप्रिल २००९ रोजी त्यांचे निधन झाले.
अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री सुजाता कुमार यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यांना चौथ्या टप्प्यातील मेटास्टॅटिक कर्करोग (मेटास्टॅटिक) झाला.