3 idiots chatur actor Omi Vaidya will now be seen in the Marathi Movie aaichya gavat marathi bol  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Omi Vaidya In Marathi Movie : 3 इडियट्स चित्रपटातील 'चतुर' दिसणार मराठी चित्रपटात, 'आईच्या गावात मराठीत बोल'मध्ये साकारणार मुख्य भूमिका

Omi Vaidya In Marathi Movie: 3 इडियट्स चित्रपटातील 'चतुर' दिसणार मराठी चित्रपटात, 'आईच्या गावात मराठीत बोल'मध्ये साकारणार मुख्य भूमिका

साम टिव्ही ब्युरो

Omi Vaidya In Marathi Movie:

थ्री इडियट्स या ब्लॉकबस्टर बॉलीवूड चित्रपटातील चतुर रामलिंगम उर्फ सायलेन्सरची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्यने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. ही भूमिका साकारल्यावर प्रेक्षकांना ओमी वैद्य केरळ, मल्याळी किंवा तामिळ, असेल असं अनेकांना वाटलं असेल. मात्र असं नाही आहे, ओमी वैद्य हा मराठी मुलगा आहे.

आणखीन आश्चर्याची गोष्ट म्हणजे ओमीने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतल्या महाराष्ट्र मंडळातल्या गणेश उत्सवातल्या नाटकाने केली होती. मग पहिला सिनेमा दिग्दर्शित करायचा तर तो मायभाषेतच या ओमीच्या निर्णयाबद्दल कुणाला नवल वाटायचं कारण नाही. यातच आता ओमीची प्रमुख भूमिका असलेला 'आईच्या गावात मराठीत बोल' हा धम्माल विनोदी चित्रपट येत्या १९ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चित्रपटाचा नायक समर (ओमी वैद्य), अमेरिकेतून भारतात आल्यावर अनपेक्षित वळणांचा प्रवास प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. वाक्यागणिक मराठीचा अपभ्रंश करणारा , धेडगुजरी बोलणाऱ्या समरची कायापालट होऊ शकते का? साता समुद्रापार वसलेली आपल्या महाराष्ट्राची मुलं बाळं एक आधुनिक "मराठीपण" जोपासू शकतील काय? हाच त्याचा प्रवास आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहे. (Latest Marathi News)

या चित्रपटाची निर्मिती अहमद लुकान, डॉ. पुनीत चांडक, डॉ. सुमुल रावल, मार्थेश्वरन सोलामुथू, माईक कासिन, राजन वासुदेवन, संजय सहगल, शाहीन गांधी, स्टीव्हन मोरलँड, सुप्रतीम डे, उदय कुमार यांनी केली आहे.

अमेरिकेत जन्मलेला पण महाराष्ट्रबद्दल उर्मी असणारा ओमी वैद्य आणि अमेरिकेत राहत असून मराठीचा वसा जोपासणारी अमृता हर्डीकर यांनी अमेरिकेतच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहून चित्रपटाची आखणी सुरु केली. सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी योगेश कोळी यांनी सांभाळली आहे. तर संगीत आणि पार्श्वसंगीत - अविनाश विश्वजीत यांनी दिलेले आहे. तसेच या चित्रपटाचे संकलन मयूर हरदास आणि ओमी वैद्य यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT