youth injured in firing near nashik  Saam Digital
क्राईम

Nashik Crime : गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, यात्रेच्या वर्गणीवरून मित्रांमध्ये झाला टोकाचा वाद

Nashik Crime News : सचिन मानकर याच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. या गोळीबाराने चाडेगाव परिसरात खळबळ उडाली. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Siddharth Latkar

- तबरेज शेख

Nashik :

नाशिकरोडपासून जवळच असलेल्या चाडेगाव रस्त्यावर एका युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यात जखमी झालेल्या युवकावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सचिन मानकर असे गाेऴी झाडल्याचे नाव असून ज्ञानेश्वर मानकर यास गाेऴी लागल्याचे समजते. पाेलिस संशयित आराेपीचा शाेध घेताहेत. (Maharashtra News)

चाडेगाव येथे ग्रामदैवत काशाई देवीच्या यात्रोत्सवानिमित्त काल रात्री गावात नियोजनासंदर्भात वर्गणी गोळा करण्यासाठीची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र सध्या गावात हरिनाम सप्ताह सुरू असल्याने यात्रोत्सावाची बैठक रद्द झाली.

त्यानंतर गावातीलच सचिन मानकर यांच्यासह चार-पाच जण आणि ज्ञानेश्वर बंडु मानकर हे सोबतच एकत्रितपणे हॉटेलमध्ये गेले होते. हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर हॉटेलच्यापुढे नाल्याच्याजवळ त्यांची यात्रोत्सवाबाबत चर्चा सुरु असताना वाद झाला.

मागील वर्गणीचे पैसे ज्ञानेश्वर उर्फ बंडु मानकर याच्याकडे जमा होते. याबाबत सचिन मानकर यांनी त्याला विचारणा केली. त्यातून वादाला ताेंड फुटले. याचा राग अनावर होऊन सचिन मानकर याने आपल्याजवळ असलेल्या पिस्तुलामधून ज्ञानेश्वर उर्फ बंडू मानकर याच्यावर गोळीबार केला. त्यात दोन गोळ्यांपासून त्याने बचाव केला. मात्र 1 गोळी त्याला चाटून गेली. तर एक गोळी कमरेला लागल्याने तो जखमी झाल्याचे समजते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सचिन मानकर याच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. या गोळीबाराने चाडेगाव परिसरात खळबळ उडाली. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी घटनास्थळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी भेट दिली. आरोपीच्या शोधासाठी तपास पथके तयार करण्यात आली आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT