Pune Crime  Saam Tv
क्राईम

Pune Crime : प्रेमसंबंधास विरोध केल्याने मैत्रिणीच्या आईचा पत्ता केला साफ; हत्येनंतर रचला आत्महत्येचा बनाव

Pune Crime : प्रेमसंबंधाला विरोध केल्याने एका तरुणाने मैत्रिणीच्या आईची हत्या केलीय. याप्रकरणी मैत्रिणीने पोलिसात तक्रार दिलीय. चतुःशृंगी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून पुढील तपास सुरू केलाय.

Bharat Jadhav

Pune Crime Young Man Killed His Girl Friend Mother:

प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे एका तरुणाने प्रेयसीच्या आईची हत्या केलीय. ही घटना पुण्यातील पाषाण- सूस रस्त्यावरील एका सोसायटीत घडली. वर्षा जगदीश क्षीरसागर (वय ५८) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. शिवांशू दयाराम गुप्ता (वय २३, रा. प्रतीकनगर, मोहनवाडी, येरवडा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. चतुःशृंगी पोलिसात प्रेयसीने तरुणाविरोधात तक्रार दिलीय.(Latest News)

या घटनेच्या मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि शिवांशू दोघे आयटी पार्कमध्ये काम करीत होते. शिवांशू सध्या बेरोजगार होता. त्यांच्यात मागील ७ महिन्यांपासून मैत्रीचे संबंध होते. परंतु काही कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होते. दरम्यान तरुणीने शिवांशूला प्रेमसंबंधसाठी नकार दिला होता. तरुणीची आई वर्षा क्षीरसागर यांचाही त्यांच्या प्रेमाला विरोध होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

‘माझ्या मुलीशी प्रेमसंबंध ठेवू नको,’ असे शिवांशूला बजावलं होतं. त्याचा राग शिवांशूच्या मनात होता. तो १८ जानेवारी रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास सोसायटीत गेला. त्यावेळी वर्षा एकट्याच घरी होत्या. त्याने श्वानाला बांधण्यासाठी असलेल्या पट्ट्याने वर्षा यांचा गळा आवळून खून केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केलाय. तपासादरम्यान, वर्षा यांचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आले.

आत्महत्येचा बनाव

आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह बेडरूमध्ये ठेवला. कोणाला संशय येऊ नये, यासाठी बेडरूमच्या बाहेर येऊन त्याने दोरीच्या साहाय्याने आतून दरवाजा बंद करून घेतला. त्याने महिलेने आत्महत्या केल्याचा असा बनाव रचला. परंतु सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरातील पीडितांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

Government Scheme: बंगालमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार, तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT