Yavatmal Pimpalgaon younger brother killed his elder brother Saam Tv News
क्राईम

VIDEO : आई-वडिलांना भेटून परतताना आक्रित घडलं, सख्ख्या लहान भावाने मोठ्या भावाला संपवलं; आई-बापाचं काळीज जळालं

Yavatmal Pimpalgaon Brother Murder : कौटुंबिक वादातून लहान भावाने लोखंडी रॉडने मोठ्या भावाच्या डोक्यावर प्रहार करून त्याची हत्या केली. ही घटना यवतमाळ शहरातील बालाजी मंगल कार्यालय पिंपळगाव येथे घडली.

Prashant Patil

संजय राठोड, साम टिव्ही

यवतमाळ : यवतमाळच्या पिंपळगाव येथे लहान भावाने मोठ्या भावाची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रमोद पेंदोरे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. हत्येची ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाली असून, लोखंडी रॉडने आरोपी कवीश्वर हा आपल्या सख्ख्या मोठा भाऊ प्रमोदला भर वर्दळीच्या रस्त्यात मारताना दिसत आहे. यावेळी शेजारूनच अनेक नागरिक ये-जा करीत असले तरी कुणीही मदतीला धावताना दिसत नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, घटनेतील आरोपीाला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

कौटुंबिक वादातून लहान भावाने लोखंडी रॉडने मोठ्या भावाच्या डोक्यावर प्रहार करून त्याची हत्या केली. ही घटना यवतमाळ शहरातील बालाजी मंगल कार्यालय पिंपळगाव येथे घडली. या घटनेनं परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रमोद पंढरीनाथ दिंडोरे (वय ३५, रा. तिरुपती नगर पिंपळगाव) असं मृतकाचं नाव आहे. तर कवीश्वर पंढरी पेंदोरे (वय ३४, रा. तिरुपती नगर पिंपळगाव) असं आरोपी भावाचं नाव आहे. मृतक प्रमोद याने २०१७मध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून तो भाड्याने रूम करून राहत होता. आई-वडिलांना भेटून परतीच्या मार्गावर असताना सायंकाळी पिंपळगाव येथील बालाजी मंगल कार्यालयाजवळ लहान भाऊ प्रमोद याने लोखंडी रॉडने सपासप वार करून ठार केलं. दरम्यान, घटनेतील आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

अड्ड्यावरील कामगारांकडून बेदम मारहाण

दरम्यान, नागपूरमध्ये देखील अशीच एक हत्येची घटना समोर आली आहे. दारू पिण्यासाठी गेलेल्या तरूणाच्या हातातून दारूचा ग्लास खाली पडून फुटल्याच्या कारणावरून गुत्त्यावरील कामगारांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना नागपुरातील खडगाव मार्गावरील सायरे देशी दारूगुत्त्यावर घडली असून, या घटनेनंतर पोलिसांनी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच चौकशी करून पाच आरोपींना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT