क्राईम

Crime News:'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या प्रेयसीनेच केली प्रियकराची हत्या; विवस्त्र करून केली मारहाण, नंतर जीवच घेतला

Crime News : चार वर्षापासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराची हत्या प्रेयसीनेच केल्याची घटना घडलीय. मुलगा आणि इतर तीन लोकांच्या मदतीने महिलेने प्रियकराला विवस्त्र करून मारहाण केली नंतर जखमी अवस्थेत त्याला फेकून दिलं.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

(माधव सावरगावे)

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News:

छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक घटना घडलीय. चार वर्षे 'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या महिलेने प्रियकराची हत्या केलीय. आपल्या मुलाच्या मदतीने या महिलेने भेटीसाठी घरी आलेल्या प्रियकराला विवस्त्र करत मारहाण केली. त्यानंतर त्याला टेकडीवर फेकून दिलं. (Latest News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या प्रियकराचं नाव आनंद साहेबराव वाहुळ (२७) रा. कबीरनगर, उस्मानपुरा) आहे. आनंद हा रिक्षाचालक होता. त्याचं एका ४५ वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबध होते. ते दोघेही चार वर्षांपासून 'लिव्ह इन' मध्ये राहत होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू झाला होता. त्यामुळे आनंद हा मुंबईला निघून गेला होता. मात्र मागील आठवड्यात तो पुन्हा शहरात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शहरात आल्यानंतर तो महिलेला भेटण्यासाठी तिच्या चिकलठाणा परिसरातील घरी गेला. त्यावेळा माझा नाद सोड, माझा मुलगा मोठा झालाय, त्याला हे कळेल, वाद वाढतील, असं या महिलेने त्याला सांगितलं. परंतु आनंद यासाठी तयार नव्हता. आनंद ऐकत नसल्याचं पाहून या महिलेने त्याची हत्या करण्याचा कट केला. या महिलेने तिचा मुलगा व इतर तीन आरोपींच्या मदतीने १३ डिसेंबर रोजी आनंदला विवस्त्र करत त्याला बेदम मारहाण केली.

गंभीर अवस्थेत त्याला दुचाकीवर नेऊन साई टेकडी परिसरात फेकून दिले. दरम्यान, बेदम मारहाणीमुळे आनंदचा मृत्यू झाला. साई टेकडी परिसरात सांयकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांना मृतदेह आढळला. त्यांनी या प्रकरणाची माहिती चिकलठाणा पोलिसांना दिली. या घटनेचे माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर, उपनिरीक्षक योगेश खटाणे यांचे पथक घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेनदासाठी घाटीतील शवागृहात पाठवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT