Sangli Crime saam tv
क्राईम

Sangli Crime : सांगली हादरली! मूल होत नसल्याने महिलेवर पती आणि मांत्रिकासह तिघांकडून सामूहिक बलात्कार

Sangli Crime : मूल होत नसल्याच्या अंधश्रद्धेला बळी पडून सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी सासरच्या लोकांनी एका विवाहितेचा शारीरिक तसंच मानसिक छळ केला आहे.

Surabhi Jagdish

सांगलीमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाळी एक मोठी आणि धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी मूल होत नाही या अंधश्रद्धेला बळी पडत एका विवाहित महिलेच्या तिच्याच सासरच्या व्यक्तींनी शारीरित आणि मानसिक छळ केला असल्याचं समोर आलं आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या विवाहितेवर शुद्धीकरणाच्या नावाखाली पती, दीर आणि मांत्रिकाने अर्जुनवाड (ता. शिरोळ) याठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेमुळे खळबळ उडाली असून याची विश्रामबाग पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या गंभीर घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात देखील खळबळ माजली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यामधील एका तरुणीचा सांगलीतील विश्रामबाग परिसरातील सुशिक्षित कुटुंबातील तरुणाशी लग्न झालं होतं. यानंतर त्या तरूणीला मूल होत नसल्यामुळे तिचा छळ कऱण्यास सुरुवात केली गेली. यामध्ये कुटुंब अंधश्रद्धेच्या आहारी गेलं होतं. यानंतर घरात सतत बुवा किंवा महाराज यांना घरी बोलवलं जात होतं. या अंधश्रद्धेच्या आहारी तिला बुवाचे पाय धुवून पाणी प्यायला लावण्यात आलं. विश्रामबागेतील घरी तसेच अर्जुनवाडमधील मंदिरात या तरूणीचा छळ सुरू होता.

काही काळापूर्वी या तरूणीचं संपूर्ण सासरचं कुटुंब गाडीतून निघालं असता वाटेत त्यांची गाडी बंद पडली. यावेळी सासरच्या मंडळींनी अर्जुनवाडमधील बुवा काशिनाथ उगारे याला फोन केला. यावेळी या कथित बाबाला संपूर्ण हकीकत सांगण्यात आली. त्यावेळी या बाबाने पीडितेच्या कुटुंबीयांना तुमची सून अपशकुनी असून तिचं शुद्धीकरण करावं लागेल, असं सांगितले.

यावेळी दुसऱ्याच दिवशी त्यांनी धार्मिक विधी करण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे बुवा उगारे पीडित तरुणीच्या घरी आला. यावेळी पूजापाठ झाल्यानंतर तरुणीस अंघोळ करण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर शुद्धीकरणाच्या नावाखाली पती, दीर आणि बुवा काशिनाथ यांनी या तरूणीवर बलात्कार केला.

या संपूर्ण प्रकारानंतर ही तरूण माहेरी गेली आणि काही दिवस रडतच होती. अखेर तिच्या आईने सतत याबाबत विचारणा केल्यानंतर तिने घडलेली कहाणी सांगितली. त्यामुळे माहेरच्या मंडळींना चांगलाच धक्का बसला. त्यानंतर पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यामध्ये आता जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार पती, दीर, सासू, सासरे आणि बुवाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पती, दीर, बुवा काशिनाथला अटकही केली गेलीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life: हेल्दी राहण्यासाठी आहारात करा 'या' फायबरयुक्त पदार्थांचा समावेश

IND vs SA: पहिल्या टी-२० साठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११! हा खतरनाक ऑलराऊंडर पदार्पण करणार

Old Clothes: जुने कपडे दुसऱ्यांना देतायत?तर या वास्तू टीप्स फॉ़लो करा, अन्यथा...

Sonakshi Sinha: सोनाक्षीच्या लाल ड्रेसने चाहत्यांना केलं घायाळ; सिंपल लूकची होतेय चर्चा

Shani Gochar 2024: देव दिवाळीनंतर 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार शनीदेवाचा आशीर्वाद; नशीबाचे दरवाजे उघडणार

SCROLL FOR NEXT