WOMAN ALLEGES MOLESTATION TWICE DURING GOA-MUMBAI PRIVATE BUS JOURNEY | MAHARASHTRA CRIME NEWS 
क्राईम

धक्कादायक! रात्रीच्या प्रवासादरम्यान खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग

Molestation With Woman Passenger In Mumbai Bus: गोवा ते मुंबई या रात्रीच्या प्रवासादरम्यान एका खाजगी बसच्या क्लिनरने दोनदा विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

Bharat Jadhav

  • गोवा-मुंबई खासगी बसमध्ये महिला प्रवाशाच्या विनयभंगाचा आरोप.

  • बसच्या क्लिनरने दोन वेळा गैरवर्तन केल्याचा महिलेचा दावा.

  • महिलेने प्रवासादरम्यान पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून तक्रार केली.

गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसमधील महिला प्रवाशाचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवासादरम्यान बसच्या क्लिनरने दोन वेळा महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप या महिलेनं केलाय. या प्रवासादरम्यान संगमेश्वर इथं पहिल्यांदा झोपेतून उठवण्याच्या बहाण्याने आणि नंतर पोलादपूर इथं विनयभंग केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

पीडित महिलेने रात्री तात्काळ पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. त्यानंतर, रायगडमधील कोलाड पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून पुढील तपासासाठी प्रकरण संगमेश्वर पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे. आपल्यापैकी अनेकजण रात्रीचा प्रवास करताना आरमदायी खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडत असतो. परंतु खासगी बस प्रवास करण मात्र सुरक्षित नसल्याचं समोर आलयं.

याप्रकरणी आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करुन सरकारला महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न केला आहे. पीडित महिला ही संभाजीनगर परिसरातील असून विरोधी अंबादास दानवे यांनी या संदर्भात ट्विट करत सरकारने लाडकी बहीण नावापुरती न म्हणता या महिलेच्या पाठीशी उभं रहावं, अशी मागणी त्यांनी केलीय. ही बस गोव्याहून मुंबईकडे जात होती. राजधानी ट्रॅव्हल्स कॉर्पोरेशनच्या एमएच-43-सिके-2981 क्रमांकाची ही बस होती.

या बसमधून छत्रपती संभाजीनगरमधील एका महिला प्रवास करत होती. प्रवाशाला रात्री साडेतीनच्या सुमारास बसच्या स्टाफकडूनच तब्बल तीनवेळा आपल्याला त्रास देण्यात आल्याचा गंभीर आरोप महिलेने केलाय. महिला प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या या मुजोर स्टाफला धडा शिकवण्यासाठी संबंधित बस कोलाड (जि. रायगड) पोलिस ठाण्यात वळवण्यात आली आहे.

या घटनेवरून ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका करत त्यांना महिला सुरक्षेचा प्रश्न केलाय. ‘लाडकी बहीण’ म्हणणे केवळ घोषणांपुरते मर्यादित राहू नये, या महिलेच्या पाठीशी सरकार आणि पोलिस ठामपणे उभे आहेत, हे कृतीतून दाखवून द्यावे, अशा शब्दात अंबादास दानवेंनी या घटनेवर संताप व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2 लाखांना विकला मतदानाचा अधिकार, कराडमध्ये लोकशाहीचा लिलाव

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा बालेकिल्ला ढासळला; दोन पराभव पचवलेल्या प्रशांत किशोर यांचा करिश्मा

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! शिंदेंना टक्कर देणाऱ्या बड्या महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

साराचा हॉट व्हिडिओ व्हायरल? सारा तेंडूलकरच्या व्हायरल व्हिडिओचं सत्य काय?

Saam TV Impact: बाळूमामा देवस्थानातील घोटाळेबाजांवर कारवाई, साम टीव्हीच्या बातमीनंतर कारवाईचा धडाका

SCROLL FOR NEXT