Haryana Crime Saam Tv
क्राईम

Crime: अपहरण करून तरुणीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग

Haryana Crime: हरियाणामध्ये २४ वर्षीय तरुणीचे अपहरण करून ५ जणांनी जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी अश्लिल व्हिडीओ तयार करून पीडितेला ब्लॅकमेलिंग केले. या घटनेमुळे हरियाणा हादरले.

Priya More

Summary:

  • हरियाणामध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

  • तरुणीचे अपहरण करून अत्याचार

  • अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग

  • जंगलात नेऊन पाच जणांकडून सामूहिक बलात्कार

हरियाणामध्ये २४ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. हरियाणाच्या पलवलमध्ये ही घटना घडली होती. आरोपींनी तरुणीला घरातून बाहेर बोलावून घेतलं नंतर तिचे अपरहण करून जंगलात नेलं. त्याठिकाणी आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. आरोपींनी यावेळी अश्लिल व्हिडीओ देखील तयार केले. तरुणीला व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पलवलमध्ये १७ एप्रिल रोजी ही घटना घडली. २४ वर्षीय तरुणीला एका व्यक्तीने घराबाहेर बोलावले. यावेळी आरोपीने त्याच्या मित्रासह या तरुणीचे अपहरण केले. त्यानंतर आरोपी तिला जंगलामध्ये घेऊन गेले. त्याठिकाणी या दोघांचे ३ मित्र आधीच उपस्थित होते. आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. अश्लिल व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली आणि गप्प राहण्यास सांगितले. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून उटावड पोलिसांनी ५ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

तरुणीने तक्रारीत सांगितले की, ती तिच्या कुटुंबासोबत राहते. तिचे वडील कामामुळे अनेकदा घराबाहेर असतात.१७ एप्रिल रोजी संध्याकाळी उशिरा तिच्या गावातील एक महिला तिच्या घरी आली आणि तिने तिला हाक मारली. त्या महिलेची हाक ऐकून ती तिला भेटायला बाहेर गेली. त्यानंतर त्या महिलेने त्या तरुणीला घराबाहेर नेले. घराबाहेर तिच्याच गावातील दोन तरुण उभे होते. ज्यांनी पीडितेला जबरदस्तीने पकडून तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. तिने ओरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला पण आरोपींनी तिच्या तोंडात कापड कोंबले आणि तिला जंगलात घेऊन गेले. तिथे आधीच तीन जण उपस्थित होते.

तिथे आरोपींनी तिच्यावर एकामागून एक सामूहिक बलात्कार केला आणि त्या घटनेचा व्हिडीओ तयार केले. जर या घटनेबद्दल कुणाला सांगितले तर तुला जीवे मारून टाकू अशी धमकी आरोपींनी दिली. तसंच व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देखील देण्यात आली. पीडितेने भीतीपोटी आपल्या कुटुंबीयांना याबद्दल सांगितले नाही. जेव्हा आरोपीने तिचा छळ करण्यास सुरुवात केली, तेव्हा तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीला उटावाड पोलिस ठाण्यात नेऊन लेखी तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

SCROLL FOR NEXT