crime news google
क्राईम

Crime News: पत्नीचं अफेअर; नवऱ्याचं डोकं फिरलं, थेट बॉयफ्रेंडचे कानच कापले

Marriage Crisis: जोधपूरच्या बोरानाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत, प्रेमसंबंधाच्या रागातून पतीने पत्नीच्या प्रियकरावर हल्ला केला असून त्याचे दोन्ही कान कापले, पीडित रुग्णालयात उपचार घेत आहे.

Dhanshri Shintre

राजस्थानच्या जोधपूर शहरातील बोरानाडा पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळताच संतप्त झालेल्या पतीने पत्नीच्या प्रियकरावर थेट कारखान्याबाहेर हल्ला केला. या हल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जोधपूरमधील मथुरादास माथुर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी रमेश बिश्नोई नावाचा ट्रक ड्रायव्हर असलेला त्याचे संबंध एका विवाहित महिलेसोबत होते. ही गोष्ट नवऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने रागाच्या भरात थेट रमेशवर प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

रात्री २ वाजता रमेश बिश्नोई जोधपूरमधील कारखान्यात साखर घेऊन जात असताना, अचानक त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. संतप्त पती आपल्या दोन साथीदारांसह कारमधून आला आणि कारखान्याच्या बाहेर रमेशवर थेट हल्ला केला. केवळ गोळीबारच नव्हे तर आरोपीने सीमा ओलांडत रमेशचे दोन्ही कान कापले.

या हल्ल्यात रमेश गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने मथुरा दास माथुर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पत्नीचे प्रेमसंबंध कळताच रागाच्या भरात हा संपूर्ण प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून सध्या पोलीस आरोपीचा तपास करत आहेत. परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

जोधपूरच्या जांभा गावातील दोन व्यक्तींमधील पाच वर्षांपासून सुरू असलेला वाद अखेर हिंसक वळणावर गेला. बोरानाडा परिसरात झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या रमेश बिश्नोईची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. बोरानाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी शकील अहमद यांनी सांगितले की, आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक मनाराम तपासाचे नेतृत्व करत आहेत. पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी तपासाचे चक्र वेगात फिरवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT