Crime News  Saam Digital
क्राईम

Crime News: प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं, नंतर मृतदेहाशेजारीच केलं भयानक कृत्य; निर्दयी पत्नी गजाआड

Uttar Pradesh Crime News: याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Satish Daud

Wife killed husband

अनैतिक संबधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढला. त्यानंतर मृतदेहाशेजारीच दोघांनी शय्या केली. ही संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हरदोई जिल्ह्यातील भडना गावात १२ एप्रिल रोजी पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी मृतदेहाची सविस्तर तपासणी केली असता, मृताच्या डोक्यावर, डोळ्याजवळ तसेच कानाजवळ जखमेच्या खुणा आढळून आल्या.

या व्यक्तीची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना आला. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दरम्यान, सदरील व्यक्तीचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाला, असा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यामुळे आरोपीला शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले.

घटनेचा तपास करत असताना मृत व्यक्तीच्या पत्नीचे गावातील एका तरुणासोबत संबंध असल्याचं कळालं. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. सुरुवातील मृत व्यक्तीच्या पत्नीने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, महिला पोलिसांनी खाक्या दाखवताच ती पोपटासारखी बोलू लागली.

आरोपी महिलेचे गावातील एका तरुणासोबत प्रेम जडले होते. दोघेही बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये राहत होते. यादरम्यान दोघांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण महिलेच्या पतीला लागली. त्याने पत्नीला तरुणापासून दूर राहण्यास सांगितले.

यावरुन दोघांमध्ये अनेकदा वाद देखील झाले. या वादातून तिने पतीच्या हत्येचा कट रचला. यामध्ये तिच्या प्रियकराने तिला पूर्ण साथ दिली. गहू काढणीच्या बहाण्याने महिलेने तिच्या पतीला शेतात नेलं. तिथे तिचा प्रियकर आथिक उपस्थित होता. यावेळी दोघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली.

त्यानंतर मृतदेह शेतात फेकून दिला. धक्कादायक बाब म्हणजे, पतीचा खून केल्यानंतर पत्नीने मृतदेहापासून काही अंतरावर प्रियकरासोबत शय्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या पतीला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं, गर्भवती महिलेने चिमुकलीसह विहिरीत मारली उडी

Crime: संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून...

Haryana: दोन गटात हाणामारी; दगडफेकीनंतर वाहनं पेटवली, अनेकजण जखमी

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

SCROLL FOR NEXT