Crime News : साताजन्माची साथ देणारी बायको अचानक नवऱ्याच्या जीवावर का उठते? कारणे आणि आकडेवारीही धक्कादायक, सर्वाधिक घटना कोणत्या राज्यात? meta ai
क्राईम

Husband - Wife : बायको अचानक नवऱ्याच्या जीवावर का उठते? कारणे आणि आकडेवारीही धक्कादायक, सर्वाधिक घटना कोणत्या राज्यात?

Madhya Pradesh Crime News : पतीच्या हत्येच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झालीय. याबाबतीत मध्य प्रदेश दुसऱ्या स्थानी आहे. गेल्या ६ महिन्यांत अशा ३६ घटनांनी मध्य प्रदेश हादरलंय.

Shruti Vilas Kadam

नीळ्या रंगाच्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, पत्नीनेच केली हत्या....नवऱ्याची हत्या करून मृतदेह घरातच पुरला...पत्नीला अटक...अशा मथळ्याच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांत ऐकायला, बघायला मिळाल्या. प्रत्येक घटनांमागची हिस्ट्री, कारणं वेगवेगळी असतील, पण या घटनांनी अवघा देश, समाज हादरून गेला. पती वर्गाची चिंता वाढली. तर, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊसही पडला. काही रील्स तर गंमत म्हणून केले गेले, पण त्यामागचं भीषण वास्तव भयावह आणि विचार करणारं होतं. पत्नी आपल्या पतीची हत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल का उचलते? काय कारणं असतील, सगळ्यात जास्त अशा प्रकारच्या घटना कुठे घडल्या? याबाबतची धक्कादायक माहिती आणि आकडेवारी समोर आली आहे.

मध्य प्रदेशातील पती हत्येच्या वाढत्या घटनांमुळं वेगवेगळ्या व्यासपीठांवर चर्चेला फोडणी मिळाली आहे. पुरुषांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांच्या दाव्यानुसार, जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत मध्य प्रदेशात अशा ३६ घटना घडल्या. त्याआधारे मध्य प्रदेश देशात दुसऱ्या स्थानी आहे. तर महिलांशी संबंधित वाद, कौटुंबिक तणाव आणि वैवाहिक समस्यांबाबत मदत मागणाऱ्या पुरुषांची संख्याही कमालीची वाढलीय. या कालावधीत पुरुषांकडून हेल्पलाइनवर मदतीसाठी १२, ५७७ कॉल नोंदवण्यात आले आहेत. ही आकडेवारी चिंताजनक असून, राष्ट्रीय पुरुष आयोगाची स्थापना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

६ महिन्यांत ३६ घटना

पुरुषांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांच्या आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशात जानेवारी ते जून या ६ महिन्यांच्या काळात बायकोकडून पती हत्येच्या ३६ घटनांची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेशात ९३ घटना घडल्या आहेत. हे राज्य पहिल्या स्थानी आहे. संघटनांच्या म्हणण्यानुसार, अशा घटनांमध्ये होणारी वाढ ही चिंतजनक आहे. या घटनांची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरमधील सोनम रघुवंशी प्रकरणाची देशभरात चर्चा झाली होती.

महिलांशी संबंधित वाद, वैवाहिक समस्यांबाबत मदत मागणाऱ्या पुरुषांची संख्या लक्षणीय आहे. ते मदतीसाठी हेल्पलाइनचा आधार घेत असल्याचं दिसून आलंय. आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये मध्य प्रदेशात पुरुषांकडून मदतीसाठी हेल्पलाइनवर ८ हजारांपेक्षा अधिक कॉलची नोंद झालीय. तर २०२६ मध्ये जूनपर्यंत ही संख्या वाढून १२, ५७७ वर पोहोचली आहे. पुरुष हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांच्या दाव्यानुसार, ही परिस्थिती केवळ मध्य प्रदेशापुरती मर्यादित नाही. २०२५ मध्ये हेल्पलाइनवर पुरुषांकडून मदतीसाठी ५८ हजारांपेक्षा जास्त कॉलची नोंद झाली होती. तर २०२६ मध्ये पहिल्या सहा महिन्यात ८७, ९६९ कॉलची नोंद झालीय. कौटुंबिक कलह, वैवाहिक वाद, ताणतणाव आणि कायदेशीर प्रकरणांशी संबंधित मदतीसाठी पुरुष हेल्पलाइनवर संपर्क करत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याचेही संघटनांचं म्हणणं आहे.

पत्नीच्या तावडीतून सुटकेसाठी मदत मागताहेत पुरुष

पुरुषांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थांच्या दाव्यानुसार, हेल्पलाइनवर पुरुषांकडून मदतीसाठी हजारो कॉल येत असतात. वैवाहिक वाद आणि कुटुंबातील तणावाला वैतागून मदत मागणाऱ्या पुरुषांची संख्या लक्षणीय आहे. आपल्या समस्या सांगून कायदेशीर आणि मानसिक मदत मागणाऱ्या पुरुषांची संख्या त्यात अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्याचमुळे राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर राष्ट्रीय पातळीवर पुरुष आयोगाचीही स्थापना करण्यात यावी किंवा त्याचा विचार करण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Maharashtra News Live Update: Dhule: चाकणमधील २० कंपन्यांच्या स्थलांतरावर शरद पवारांची चिंता सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा

अमरावतीच्या निवासी आश्रमशाळेत भूत? 600 विद्यार्थिनींनी घराकडे ठोकली धूम

Maharashtra Weather: राज्यातील २७ जिल्ह्यांसाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; मुंबईसह कोकण विदर्भाचं हवामान कसं असणार?

Fact Check: रेशन कार्ड बंद होणार? जनता लाभांपासून वंचित राहणार?

आमदारांची पेन्शन बंद होणार? आमदारांच्या पेन्शनविरोधात याचिका

SCROLL FOR NEXT