Walmik Karad Gang  
क्राईम

Walmik Karad Gang : कराड तुरूंगात, गँग कोण चालवतंय? धनंजय देशमुखांचे गंभीर आरोप

Walmik Karad Gang Story : बी टीमला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र त्यांची थातूरमातूर चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आल्याचा आरोपही देशमुखांनी केलाय.

Tanmay Tillu

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता एक नवी गँग समोर आलीय....कराड जेलमध्ये असताना ही बी टीम कोण चालवतंय...ती बाहेर राहून पुरावे नष्ट करत आहे का? या बी टीमबाबत धनंजय देशमुखांनी नेमके काय आरोप केले आहेत पाहूयात त्यावरचा हा विशेष रिपोर्ट....

https://www.youtube.com/watch?v=cN3LCMJUWZY

मकोका अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराडसह सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येतील सात आरोपी जेलमध्ये असताना कराडची बी टीम बीडमध्ये अजूनही सक्रिय असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी केलाय...आणि या बी टीमकडे पोलिसांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचंही त्यांचं म्हणणयं.

या बी टीमला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र त्यांची थातूरमातूर चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आल्याचा आरोपही देशमुखांनी केलाय. जर ही बी टीमही कटात सहभागी होती आणि नंतर आरोपींना अंथरूण पांघरूण पुरवण्यापासून ते त्यांच्या गाड्यांची सोय लावण्याचं काम यांनी केलं असेल तर त्यांची कसून चौकशी का होत नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. कोण आहेत या बी टीमचे मेंबर ते पाहूयात...

कराडची बी टीम ?

बालाजी तांदळे

संजय केदार,शेजारील गावचा सरपंच

डॉ. वायभसे पती-पत्नी

तर ही बी टीम कार्यरत असून त्यांचे अनेक व्हिडिओ आपल्याकडे आहेत असा दावा अंजली दमानियांनी केलाय. मात्र बीडचे पालकमंत्री हे अजित पवारच आहेत त्यामुळे त्यांच्याकडे कारवाईची मागणी करणं चुकीचं असल्याची खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिलीय..तर या बी टीमला सहआरोपी का करू नये असा सवाल भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय.

बीड पोलीस आणि सीआयडीकडून वाल्मीक कराडसह त्याच्या सहकाऱ्यांना फरार होण्यासाठी मदत करण्यांची चौकशी झाली होती. मात्र त्यांचा या हत्याकांडात थेट संबंध आढळून आला नव्हता, असे सीआयडीने स्पष्ट केले होते. त्यामुळे आता धनंजय देशमुख यांनी आरोप केलेली बी टीम नक्की कोण? त्यांचा रोख नेमका कुणाकडे? आणि ही गँग कोण चालवतंय असे अनेक सवाल उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिझेलसाठी शेतकऱ्याला पाया पडण्याची वेळ; VIDEO व्हायरल

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

Maharashtra News Live Update: लातूरच्या RCC क्लासवर शिवसेनेकडून शाही आणि काळ ऑइल फेकलं

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT