Virar Crime News Saam TV
क्राईम

Virar Crime News: पहाटे साखर झोपेत असताना घरावर बेछूट गोळीबार; विरारमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Firing On Home: मोबिन शेख यांच्या घरावर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी फायरिंग केली. त्यानंतर ते तेथून फरार झाले आहेत. ही फायरिंग आपसातील वादातून झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Ruchika Jadhav

महेंद्र वानखेडे,विरार

Virar News:

विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही अज्ञात इसमांनी एका व्यक्तीच्या घरावर गोळीबार केलाय. गोळीबार करून ते व्यक्ती तेथून फरार झालेत. गोळीबार नेमका का करण्यात आला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विरार पूर्व गोपचर पाडा येथील आशियाना अपार्टमेंटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. येथे राहणारे मोबिन शेख यांच्या घरावर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी फायरिंग केली. त्यानंतर ते तेथून फरार झाले आहेत. ही फायरिंग आपआपसातील वादातून झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

पहाटे 3 च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी काहीतरी मदतीच्या बहाण्याने मोबिन यांचे दार वाजविले. पण घरातून व्यक्ती बाहेर न आल्याने अज्ञातांनी या घरावरच बेछूट गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत होणतीही जीवितहानी झालेली नाही.पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार पहाटेच्या सुमारास झाला. गोळीबार झाला तेव्हा महिला आणि त्यांना मुलगा घरामध्येच झोपले होते. घरात झोपलेले असाना बाहेरून अचानक गोळीबार झाला. गोळीबारात या घरातील खिडकीच्या काचा फुटल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : अकलूज मध्ये फेर मतदान घेण्याची मागणी

Maharashtra Politics: मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी टाकला डाव, एकनाथ शिंदेंना धक्का; बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल

Maharashtra Politics : हायकोर्टाचा निर्णय, मतमोजणी लांबणीवर; मुख्यमंत्र्यांकडूनही आयोगावर हल्लाबोल

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

Skin Care: १० रुपयांच्या व्हॅसलीनने होतात हे फायदे; महागड्या केमिकल क्रिमची कधीच लागणार नाही गरज

SCROLL FOR NEXT