Vasai Crime News SaamTv
क्राईम

Vasai Crime : वसई हादरलं! कंपनी मालकाकडून अल्पवयीन मुलीवर सलग दोन दिवस अत्याचार

Vasai Latest News : वसई पूर्वमधील एका कंपनीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर कंपनीच्या मालकानेच सलग दोन दिवस अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Saam Tv

वसई पूर्वेच्या एका कंपनीत अल्पवयीन मुलीवर सलग दोन दिवस कंपनी मालकाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना वसईतून समोर आली आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी हा प्रकार घडला असून या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दखल करण्यात आला आहे. तर नराधम कंपनी मालक आरोपीला गुन्हे शाखा दोनच्या पथकाने तब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वसई पूर्वेच्या सातिवली येथील एका प्रिंटिंग कंपनीत पीडित १६ वर्षीय मुलगी काम करते. मंगळवारी (३१ डिसेंबर) रोजी कंपनीच्या मालकाने सदर पीडित मुलीला तिच्या विरोधात तक्रार आली असल्याचे सांगून बोलावून घेतले. त्यानंतर तिला तोडगा काढू म्हणत कार्यालयात बसवून ठेवले. त्यानंतर या नराधमाने दुपारी कार्यालयातच तिच्यावर बलात्कार केला.

या प्रकाराने पीडित मुलगी घाबरून गेली. मात्र तरीही ती दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर आली. बुधवारी (१ जानेवारी) रोजी ती पुन्हा कामावर आल्याचं पाहून संध्याकाळी सर्व कर्मचारी घरी गेल्यानंतर कंपनी मालकाने पीडितेला मोठ्या सेठना तुला भेटायचं असल्याचं सांगून थांबवून घेतलं. त्यानंतर तिला कंपनीच्या गच्चीवर नेत आणि पुन्हा तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेनंतर अखेर पीडित मुलीने वालीव पोलीस ठाणे गाठून कंपनी मालका विरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून वालीव पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ६५(१) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) च्या कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या कंपनी मालकाला तब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीचा धुरळा; ८ दिवसांत १७ जागांवर निवडणुका लागण्याची शक्यता

Diabetes Testing : ब्लड शुगर लेव्हल तपासण्याची योग्य वेळ कोणती? मिळेल अचूक रीडिंग

NEET 2026: मोठी बातमी! अखेर 'नीट' परीक्षा रद्द; पेपरफुटीची CBI चौकशी होणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Pahadi Mangalsutra Design: लग्नासाठी काहीतरी हटके हवंय? ट्राय करा पहाडी मंगळसूत्राचे हे 5 पॅटर्न, नवरीचा लूक दिसेल रॉयल

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या अपार्टमेंटमधून मारूती स्विफ्ट गाडीची चोरी, चोरीची घटना CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT