Women ran away with her lover meta ai
क्राईम

Valentine मध्ये दिला गुलीगत धोका; नवऱ्याला सोडलं, बॉयफ्रेंडसोबत ठोकली धूम

Crime News In Marathi : बंगळुरूमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाची बायको ऐन व्हेलेंटाईन वीकमध्ये तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. तिने पळून जाताना घरातील पैसे आणि मौल्यवान दागिने देखील चोरुन नेले.

Yash Shirke

Crime News : जगभरात फेब्रुवारी महिन्यामध्ये व्हेलेंटाईन वीक साजरा केला जातो. प्रेमी युगुलांसाठी हे सुखाचे दिवस असतात. पण बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका तरुणासाठी हे दिवस एका वाईट स्वप्नासारखे ठरले आहेत. या तरुणाची बायको व्हेलेंटाईन वीकमध्ये तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. अवघ्या दहा महिन्यांपूर्वी तरुणाचे लग्न झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण बंगळुरूमध्ये वास्तव्याला होता. त्याचे मूळ गाव बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यामध्ये आहे. १० फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास तरुणाची बायको घरातील पैसे आणि दागिने घेऊन तिच्या प्रियकरासह पळून गेली. तरुणाचे आई-वडील जेव्हा सकाळी उठले तेव्हा त्यांनी घडलेला चोरीचा प्रकार समजला.

२४ एप्रिल २०२४ मध्ये या तरुणाचे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनंतर तो बंगळुरूला नोकरीसाठी गेला होता. त्याने बायकोला नवा मोबाईल फोन गिफ्ट केला होता. या फोनवरुन त्याची बायको तिच्या प्रियकराशी व्हिडीओ कॉलवर गप्पा मारायची. तिचे लग्नापूर्वीपासूनच अफेयर सुरु होते. यावरुन तरुणाचे आणि त्याच्या बायकोचे भांडण देखील झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारी रोजी तरुणाच्या बायकोने तिच्या सासु-सासऱ्यांना रात्री जेवण बनवून दिले. ते दोघे झोपल्यानंतर घरातील पैसे आणि मौल्यवान दागिने घेऊन ती प्रियकरासह बाईकवर पळून गेली. दरम्यान या प्रकरणी तरुणाने त्याच्या बायको आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Silent Signs Of Kidney Damage : सकाळी शरीरात दिसणाऱ्या या 5 लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, किडनी होऊ शकते फेल

Crime: अपहरण करून तरुणीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग

Maharashtra News Live Update: रूपाली चाकणकर यांना ईडीचे समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती

Palghar Tourism : समुद्रकिनारी उभा असलेला पालघरमधील 'हा' भव्य ऐतिहासिक किल्ला, देतोय मराठ्यांच्या शौर्याची साक्ष

Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT