Uttar Pradesh Crime  Saam Tv
क्राईम

Shocking: बंद खोलीत नेलं अन् कपडे काढले, संपूर्ण शरीरावर लिंबू लावलं नंतर...; मांत्रिकाचं मुलीसोबत भयंकर कृत्य

Uttar Pradesh Crime: भूतबाधा झाल्याचे सांगत १२ वर्षीय मुलीसोबत मांत्रिकाने भयंकर कृत्य केले. एका खोलीत नेऊन मुलीला कपडे काढायला लावून तिच्या अंगाला लिंबू लावलं. त्यानंतर त्याने तिच्यासोबत भयंकर कृत्य केले. हा प्रकार पाहून मुलीचे कुटुंबीय घाबरले.

Priya More

Summary:

  • उत्तर प्रदेशमध्ये मांत्रिकाने १२ वर्षीय मुलीसोबत भयंकर कृत्य केले

  • भूतबाधा झाल्याचे सांगत या मुलीला एका खोलीत नेले

  • मांत्रिकाने मुलीला कपडे काढायला लावून तिच्यासोबत अश्लिल कृत्य केले

  • या प्रकरणी मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये मानवतेला लाजवले अशाप्रकारचा अंधश्रद्धेचा भयंकर प्रकार समोर आला आहे. १२ वर्षीय मुलीची तब्येत अचानक बिघडली त्यामुळे तिचे कुटुंबीय तिला डॉक्टरकडे घेऊन जाण्याऐवजी मांत्रिकाकडे घेऊन गेले. या मांत्रिकाने भूतबाधा झाल्याचे सांगत मुलीसोबत भयंकर कृत्य केले ते पाहून सर्वजण हादरले. उपचाराच्या नावाखाली हा मांत्रिक पीडित मुलीला एका खोलीत घेऊन गेला. खोलीचा दरवाजा बंद करून तिच्यासोबत त्याने अश्लिल कृत्य केले. या घनटेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झाशीमधील बरूसागर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावामध्ये राहणारी १२ वर्षीय मुलगी आजारी पडली. ती बरी होत नसल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी मध्य प्रदेशातील निवारी इथे राहणाऱ्या एका मांत्रिकाला बोलावून घेतलं. भूतबाधा झाली असल्याचे सांगून या मांत्रिकाने उपचाराच्या नवाखाली पीडित मुलीला एका खोलीत नेले. तिच्या कुटुंबीयांना घराबाहेर बसण्यास सांगितले. त्यानंतर मांत्रिकाने खोलीचा दरवाजा बंद केला. त्याने पीडित मुलीला घाबरवत सांगितले की ती एका खतरनाक भूताच्या प्रभावाखाली आहे.

त्यानंतर मांत्रिकाने मुलीच्या शरीरातील भूत काढण्यासाठी तिला सर्व कपडे काढण्यास सांगितले. एक लिंबू कापून तो मुलीच्या संपूर्ण शरीरावर चोळला आणि अश्लिल कृत्य करण्यास सुरुवात केली. ज्यावेळी मांत्रिकाने आपल्या मर्यादा ओलांडायला सुरूवात केली तेव्हा मुलगी जोरजोरात ओरडू लागली आणि तिने विरोध केला. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी दरवाजा उघडून खोलीत धाव घेतली. यावेळी घाबरलेल्या मांत्रिकाने दुसऱ्या दाराने पळ काढला. मुलगी प्रचंड घाबरलेली होती आणि ती जोरजोरात रडत होती. तिची अवस्था पाहून कुटुंबीय देखील घाबरले. तोपर्यंत मांत्रिक पळून गेला होता.

मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्याकडे नेमकं काय झालं? याबाबत विचारणा केली. मुलीने जे काही सांगितले ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकरली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी बरूसागर पोलिसांनी आरोपी मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस सध्या या मांत्रिकाचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपीला अटक करू असे पोलिसांनी सांगितले. तसंच सर्व नागरिकांना पोलिसांनी आवाहन केले की, कुणीही आजारी असेल तर मांत्रिकाकडे जाण्याऐवजी डॉक्टरांकडे जा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : नांदेडमध्ये दुहेरी हत्याकांड! एकाच घरातील दोन सुनांची हत्या, नेमकं काय प्रकरण?

Gold Price Today : अचानक सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 22k आणि 24k चा आजचा दर

Maharashtra Politics: अर्ज माघारी घे नाही तर..., भाजप उमेदवाराकडून काँग्रेसच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

Maharashtra Live News Update : मावळात दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित

Rava Kheer Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा झाली तर झटपट बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी रवा खीर, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT