Meerut Crime News Saam Digital
क्राईम

Meerut Crime News: विकृतीचा कळस! बारावीच्या विद्यार्थ्याला टोळक्यांनी बेदम मारहारण करत तोंडावर केली लघुशंका, मेरठमधील घृणास्पद घटना

Meerut Crime News in Marathi: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये ७ युवकांनी बारावीच्या विद्यार्थ्याला मारहाण करून त्याच्या तोंडावर लघूशंका केल्याची घृणास्पद घटना घडली आहे.

Vishal Gangurde

Uttar Pradesh Crime News:

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये ७ युवकांनी बारावीच्या विद्यार्थ्याला मारहाण करून त्याच्या तोंडावर लघूशंका केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. टोळक्यांनी कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील केला आहे. (Latest Marathi News)

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये काही दिवसांपूर्वी ७ युवकांनी १२ वीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. या टोळक्यांनी या विद्यार्थ्यावर लघुशंका केल्याची घटना कॅमेरात कैद केली. त्यानंतर या टोळक्यांनी ही घटना सोशल मीडियावर व्हायरल केली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी ७ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमकं काय घडलं?

१२ वी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी मावशीला मिठाई द्यायला गेला होता. त्यावेळी या विद्यार्थ्याला युवकांनी रस्त्यात गाठलं. या तरुणांनी जबरदस्तीने या विद्यार्थ्याचं अपहरण केलं.

यानंतर या विद्यार्थ्याला सामसूम रस्त्यावर नेऊन त्याला मारहाण केली. या टोळक्यांनी बेदम मारहाण करून मन भरलं नाही, त्यानंतर या टोळक्यांनी या विद्यार्थ्याच्या तोंडावर लघूशंका केली.

विद्यार्थ्याने कुटुंबाला सांगितली हकीकत

रात्रभर घराबाहेर असलेला विद्यार्थी घरी आल्यावर कुटुंबीयांना सर्व घटना सांगितली. पोलिसांकडे गेलो तरी मदत मिळाली नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी योग्य कारवाई देखील न केल्याचा आरोप केला आहे. १६ नोव्हेंबर रोजी पुन्हा पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांत एफआयआर नोंद करण्यात आली आहे.

मेरठचे एसपी पीयूष सिंह म्हणाले, १३ नोव्हेंबर रोजी मेरठच्या मेडिकल पोलीस स्टेशनच्या हद्दीतीस जागृती विहाराजवळ एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली. या मारहाणीनंतर तरुणावर लघूशंका देखील केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT