Uttar Pradesh Crime News  Saam Tv
क्राईम

Uttar Pradesh Crime News : फेसबुकवर मैत्री अन् प्रेम, नंतर ब्लॅकमेलिंग; इंजिनीअर तरुणाचा विवाहित महिलेवर अत्याचार

Crime News : आरोपी महिलेला व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करुन तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकू लागला. मात्र तरुणीने विरोध केला म्हणून आरोपीने तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली.

साम टिव्ही ब्युरो

Uttar Pradesh Crime News :

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील महिलेला फेसबुकवरील तरुणासोबची मैत्री चांगलीच महागात पडली आहे. तरुणाने मैत्री झालेल्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव देखील टाकला. भीतीपोटी महिलेने घर सोडले आणि दुसरीकडे राहायला गेली.

त्यानंतरही आरोपीने महिलेला धमकावून त्रास देणे सुरूच ठेवले. याप्रकरणी पीडितेने पोलिसात तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी आरोपीला नोएडा येथून अटक केली. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला गुडंबा पोलीस ठाणे परिसरात राहत होती. तिचा नवरा गुजरातमध्ये काम करतो. दरम्यान महिलेची फेसबुकवर इंजिनीअर असलेल्या निहाल नावाच्या तरुणाशी मैत्री झाली. निहाल हा लखनऊच्या मादियानव येथील शिवानी नगरचा रहिवासी आहे.

आरोपी निहाल याने महिलेशी फेसबुकवर मैत्री केल्यानंतर तिला भेटण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्याने महिलेला दारु पाजून तिच्यावर बलात्कार केला आणि व्हिडिओ देखील बनवला.

त्यानंतर आरोपी महिलेला व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करुन तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकू लागला. मात्र तरुणीने विरोध केला म्हणून आरोपीने तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली.

पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, भीतीपोटी तिने घर सोडले आणि कुटुंबासह दुसऱ्या भागात राहू लागली. तेथेही आरोपी तिचा पाठलाग करत पोहोचला. यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला नोएडा येथून अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT