Kanpur case: Wife and nephew arrested for brutally killing husband and burying body. saam tv
क्राईम

Crime News: अनैतिक संबंधात नवरा अडसर बनला, घराजवळच मृतदेह गाडला, चित्रपटापेक्षा भयानक घटना

Uttar Pradesh Crime News: एका महिलेने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या केली. त्याचा मृतदेह घराजवळ पुरला. पोलिसांनी १० महिन्यांनंतर हत्येचे गूढ उकलत आरोपीला अटक केली.

Bharat Jadhav

  • कानपूरमधील लालपूर गावात एका महिलेने तिच्या भाच्यासोबत पतीच्या हत्येचा कट आखला.

  • अनैतिक संबंधांत पती अडथळा ठरत असल्याने हत्या करण्यात आली.

  • पोलिसांनी तपास करून पत्नी लक्ष्मी आणि भाचा अमित यांना अटक केली

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेचं भाच्यासोबत अवैध संबंध होते. त्यांच्या नात्यात अडथळा ठरणाऱ्या पतीचा क्रुरपणे खून केला. इतकेच नाहीतर पतीचा मृतदेह घराच्या बाजुला पुरलाय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीय. कानपूरमधील सचेंडी परिसरातील लालपूर गावात सुमारे १० महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती.

या धक्कादायक हत्येचा उलगडा आता झालाय. तरुणाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रथम बेपत्ता व्यक्तीची तक्रार नोंदवली आणि नंतर प्रकरणाचा तपास करताना हत्येचा हा गुन्हा उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या भाच्याला अटक केली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू केलाय. लक्ष्मी आणि अमित असं आरोपींची नावे आहेत. तर शिववीर असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात १९ ऑगस्ट रोजी लालपूर गावात राहणाऱ्या सावित्री नावाच्या महिलेचा मुलगा शिववीर बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती. त्यानंतर बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा तपास सुरू केला. महिलेच्या तक्रारीत तिने म्हटले होते की, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ती बांदा येथील तिच्या घरी गेली होती.

सुमारे पाच महिन्यांनी ती परत आली तेव्हा तिचा मुलगा शिववीर घरी दिसला नाही. जेव्हा तिने तिच्या सून लक्ष्मीला विचारले तेव्हा तिने तिचा नवरा नोकरीसाठी गुजरातला गेल्याचं सांगितलं. त्यावेळी सावित्री यांनी सूनेच्या गोष्टीवर विश्वास ठेवला, परंतु खूप दिवस झाल्यानंतरही मुलाची कोणतीच बातमी मिळत नव्हती. तेव्हा तिने परत सूनेकडे चौकशी केली. त्यावेळी सून लक्ष्मीनं सासूला वेगळंच उत्तर दिलं. त्यानंतर सासू सावित्रीबाई यांनी पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

कानपूर पोलिसांचे एसीपी शिखर यांच्या मते, पोलीस तपासातही पहिला संशय महिलेच्या सुनेवर आला. सून लक्ष्मीने तिच्या प्रियकरासोबत मिळून हा गुन्हा केला असावा असा संशय शेजाऱ्यांनाही आला. यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली, त्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली.

एसीपीच्या म्हणण्यानुसार, शिववीरची पत्नी लक्ष्मीचे त्याचा भाचा अमितशी अवैध संबंध होते. पण शिववीर त्यांच्या नात्यात अडथळा ठरत होता. त्यामुळे अमित आणि लक्ष्मीने मिळून हत्येचा कट रचला. शिरवीर हा झोपेत असतानाच त्याच्यावर लोखंडी रॉडने वार करत त्याची हत्या केली.

हत्या केल्यानंतर अमितने घराजवळ एक खड्डा खोदला त्यात शिववीरचा मृतदेह पुरला. मृतदेह लवकरात लवकर कुजावा म्हणून त्याने खड्ड्यात पोतभर मीठ देखील टाकलं. होतं. पण तीन-चार दिवसांनी, मृतदेह पुरलेल्या ठिकाणी कुत्र्यांनी जमीन खोदण्यास सुरुवात केली. पकडले जाण्याच्या भीतीने, दोघांनी पुन्हा खड्डा खणला आणि शिववीरचा सांगाडा बाहेर काढला आणि तो एका पोत्यात भरला आणि नंतर संधी पाहून तो पंकी कालव्यात फेकून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खासदाराच्या बहिणीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ शूट, नंतर सासऱ्यानं भररस्त्यावर काठीनं मारलं; व्हिडिओ व्हायरल

Raigad Politics: आदिती तटकरे-भरत गोगावले खुर्चीला खुर्ची लावून बसले, कानात कुजबुजले, पालकमंत्रिपदाचा वाद मिटला?

Maharashtra Live News Update: 'सगेसोयरे' जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी धुळ्यात ओबीसी संघटना आक्रमक

Buldhana : शेतातून घरी परतत असताना दुर्दैवी अंत; नदीत पाय घसरून तरुणाचा बुडून मृत्यू

कोल्हापूर गॅझेटची आरक्षणाच्या लढाईत एन्ट्री; मराठा-कुणबी समाज एकच असल्याचा ऐतिहासिक उल्लेख|VIDEO

SCROLL FOR NEXT