Husband Bit His Wife Lips Representative
क्राईम

Husband Wife Clash: नवऱ्याचा भयानक प्रकार! चवताळून घेतला पत्नीच्या ओठांचा चावा, महिलेला पडले १६ टाके

Husband Bit His Wife Lips : नागला भुचन गावातील रहिवासी विवाहितेवर पतीने अत्याचार केले. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. सासू आणि दीरनेही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलेने केलाय.

Bharat Jadhav

संसाराचा गाडा हाकताना पती-पत्नीचे वाद-विवाद हे होत असतात, हे साहजिक आहे. परंतु कधी-कधी वादाचं रुपांतर हाणामारीत होत असतं. मथुरामध्ये मात्र एक धक्कादायक प्रकार घडलाय. वाद झाल्यानंतर एका व्यक्तीने दाताने पत्नीच्या ओठांचा चावा घेत ते कापली आहेत. हा भयानक प्रकार घडलाय मथुरामधील सौख गावात. घरात काम करत असताना नवरा-बायकोचं भांडण झालं, या भांडणात नवऱ्यानं पत्नीचे ओठ कापली.

ओठ कापल्यानंतर त्यातून रक्त येऊ लागलं. जखम मोठी असल्याने महिलेला बोलता सुद्धा येत नव्हतं. पत्नीची अवस्था पाहून पतीने तेथून पळ काढला. जखमी महिला रुग्णालयात गेल्यानंतर तिने पोलिसात पतीविरोधात तक्रार नोंदवली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना पकडण्यासाठी पोलीस छापेमारी करत आहेत. या प्रकरणाच्या अधिक माहितीनुसार, पीडित महिला नगला भूचन येथील रहिवासी आहे.

तर आरोपी पतीच नवा विष्णू आहे. दरम्यान ही घटना मागील आठवड्यात घडलीय. शनिवारच्या दिवशी महिला घरात काम करत होती. त्यावेळी तिचा नवरा तेथे आला. त्यानंतर दोघांमध्ये कोणत्यातरी गोष्टींवर वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. नवरा त्या महिलेला मारू लागला. पत्नीने नवऱ्याला विरोध केल्यानंतर त्याने पत्नीचे ओठ आपल्या दात पकडले आणि त्यांचा चावा घेतला. त्यामुळे रक्तस्त्राव सुरू झाला, महिला जोरात ओरडू लागली.

त्यावेळी महिलेला वाचवण्यासाठी तिची बहीण तेथे आली पण नवरा विष्णूने पत्नीच्या बहिणीलाही मारहाण केली. ओठ चावल्यामुळे तिला आता बोलता येत नाहीये. त्यामुळे महिलेने पती, दीर आणि सासूविरोधात तक्रार लिहून दिलीय. पीडितेने तक्रार पत्रात म्हटलं की, तिचा दीर आणि सासूनेही तिला शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

वैद्यकीय तपासणीनंतर पीडितेने तिच्या पालकांच्या घरी गेली. मिळालेल्या माहितीनुसार ओठांचा चावा घेतल्यानं महिलेच्या ओठांवर १६ टाके पडले आहेत. संपूर्ण घटना समजल्यानंतर वडिलांनी आपल्या मुलीसह मगोरा पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी पोलीस स्टेशनचे प्रभारी मोहित तोमर यांनी सांगितले की, घरगुती कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात ड्रग्जचा मोठा कारखाना सुरू करण्याचा कट उधळला; सव्वा कोटींच्या मुद्देमालासह ८ जणांना अटक

Jalna Tourism : इतिहासातील महत्त्वाचे पान! प्राचीन लेण्यांनी सजलेला जालनामधील 'हा' किल्ला, उन्हाळी सुट्टीत करा भटकंती

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुख मालामाल; दुसऱ्या रविवारी 'राजा शिवाजी' ने बनवला 'हा' मोठा रेकॉर्ड, एकूण कमाई किती?

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT