Uttar Pradesh Crime Saam Digital File Pic
क्राईम

UP Crime: भयानक! विवस्त्र अवस्थेत आढळला दलित मुलीचा मृतदेह, कवटी फोडली, काढले डोळे

Uttar Pradesh Crime: यूपीच्या अयोध्या जिल्ह्यातून एका मुलीचा मृतदेह सापडलाय. नग्न अवस्थेत मुलीचा मृतदेह कालव्यात सापडलाय. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना घडलीय. एका दलित मुलीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आलाय. क्रुरपणे या मुलीची हत्या करण्यात आली असून या मुलीचे हातपाय बांधले आहेत. नराधमांनी हत्या केल्यानंतर तिचे डोळेदेखील काढले आहेत. मृत मुलीवर अत्याचार करण्यात आला, असावा त्यानंतर तिची हत्या करण्यात आली असेल, अशी शंका पोलिसांनी वर्तवलीय.

याप्रकरणी अयोध्या पोलीस अधिकारी आशुतोष तिवारी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं की, मृतदेह आढळून आलेल्या मुलीचे वय २२ वर्ष आहे. या मुलीसंदर्भात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. शनिवारी सकाळी पोलिसांना विवस्त्र अवस्थेत या मुलीचा मृतदेह आढळून आला. निर्घृणपणे मुलीची हत्या करण्यात आलीय.

तिच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. या मुलीवर अत्याचार करण्यात आला असावा,अशी शंका पोलिसांना आहे. दरम्यान पोलीस शवविच्छेदनाचा रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहेत. पोस्ट मॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करतील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची इतक्या भयानकपणे हत्या करण्यात आलीय. तिचा मृतदेह पाहून तिची बहीण बेशुद्ध पडली.

मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीचा मृतदेह तिच्या दाजीला एका तलावात आढळून आला. हा तलाव गावापासून अर्धाकिलोमीटर दूर आहे. मृतदेह सापडल्याची माहिती त्यांनी कुटुंबीयांना दिली, त्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलीचे डोळे बाहेर काढण्यात आले असून तिच्या शरीराची अनेक हाडेही तुटलेली आढळून आली आहेत. मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला होता, तिचे डोळे फोडलेले होते, तिचे हात पाय दोरीने बांधलेले होते, चेहऱ्यावर व कवटीवर गंभीर जखमा आहेत. दरम्यान हत्या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी रात्री १० वाजता ही मुलगी कोणत्यातरी धार्मिक कार्यक्रमासाठी जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. परंतु त्याच रात्री तिचा घात झाला. गुरुवारी रात्री मुलगी घरी परतली नाही. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली. अयोध्यामधील पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. परंतु पोलिसांना मुलीचा शोध न घेता विनाकारण चौकशीत वेळ घालवला, असा आरोप हत्या झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीला ₹३००० मिळणार नाही? कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

SCROLL FOR NEXT