Uttar Pradesh Prayagraj 5 Month Old Boy Murder By Mother Saam Tv
क्राईम

Shocking : रात्रभर नवऱ्यासोबत भांडली, रागात ५ महिन्यांच्या मुलाचं डोकं फरशीने ठेचलं; जन्मदात्या आईने केली पोटच्या लेकाची हत्या

Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये पतीसोबत झालेल्या वादातून एका महिलेने आपल्या ५ महिन्यांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • प्रयागराजमध्ये आईने केली ५ महिन्यांच्या मुलीची हत्या

  • पतीसोबत झालेल्या वादातून महिलेने संतापाच्या भरात कृत्य केले

  • बाळाचा मृतदेह स्वयंपाकघरात लपवून ठेवला

  • आरोपी महिलेला अटक, पुढील तपास सुरू

Uttar Pradesh Prayagraj 5 Month Old Boy Murder By Mother उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका क्रूर आईने तिच्या ५ महिन्यांच्या मुलाची निर्घृण हत्या केली. धक्कादायक म्हणजे पतीसोबत झालेल्या वादातून संतापून महिलेने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरूर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे बुधवारी घडली आहे. आरोपी महिला मनोरमा यादव आणि तिचा नवरा संतोष यादव यांच्यामध्ये वारंवार छोट्या छोट्या कारणांवरून खटके उडत होते. पाच महिन्यांपूर्वीच मनोरमाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. ११ मार्च रोजी बुधवारी रात्री पुन्हा या दोघांमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला. नवऱ्यासोबत झालेला हा वाद मनोरमाच्या इतका जिव्हारी लागला की, तिने त्याचा राग आपल्या पाच महिन्यांच्या मुलावर काढला.

तिने घरातील फरशीच्या तुकड्याने बाळाच्या डोक्यावर जोरदार वार करून त्याला जागीच ठार केले. बाळाची हत्या केल्यानंतर मनोरमा घाबरली तिने पुरावा नष्ट करण्यासाठी मुलाचा मृतदेह स्वयंपाकघरात लपवून ठेवला होता. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पोलिसांनी आरोपी मनोरमा यादवला अटक केली. पोलिसांनी घराची झडती घेतली असता स्वयंपाकघरात लपवलेला बाळाचा मृतदेह त्यांच्या हाती लागला. पोलिसांनी याप्रकरणी कठोर कारवाई करत हत्येसाठी वापरलेला फरशीचा तुकडा जप्त केला आहे. पती-पत्नीमधील वादातून एका निष्पाप जिवाचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपी महिलेवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT