Uttar Pradesh Bulandshahr Crime Saam Tv News
क्राईम

Shocking : देखण्या भाच्याच्या प्रेमात मामी, दोघे हॉटेलमध्ये गेले अन्, समोर आला मोठा कांड; पोलिसही हादरले

Uttar Pradesh Bulandshahr Crime : गौतमबुद्धनगर परिसरातील या महिलेचं लग्न जहांगीराबाद येथे झालं होतं, तर भाचा दिल्लीचा रहिवासी आहे. दोघांचं प्रेम इतकं वाढलं की महिलेनं पतीला फसवून भाच्यासोबत पळ काढला.

Prashant Patil

बुलंदशहर : प्रेमात ना वय पाहिले जाते ना नाते-संबंध. प्रेम ही एक भावना आहे, जी कधीही, कुठेही आणि कोणासोबतही होऊ शकते. पण कधीकधी काही प्रेमकथा नात्यांनाही उद्ध्वस्त करतात. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका मामीचं मन तिच्या भाच्यावर आले. हळूहळू दोघांची जवळीक वाढली. एके दिवशी दोघेही हॉटेलमध्ये पोहोचले. पण, काही वेळातच त्यांचं स्वप्न भंगलं. त्यानंतर दोघांनी असं पाऊल उचललं की, ज्यामुळे पोलिसही हादरले. खरं तर, ही गोष्ट आता सगळ्यांना समजेल या भीतीनं दोघांनी त्या हॉटेलमध्येच विष प्राशन केलं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांची प्रकृती सुधारल्यानंतर दिल्ली पोलीस त्यांना आपल्यासोबत घेऊन गेले. नगर कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही लेखी कारवाई झाली नसल्याचं सांगितलं आहे

गौतमबुद्धनगर परिसरातील या महिलेचं लग्न जहांगीराबाद येथे झालं होतं, तर भाचा दिल्लीचा रहिवासी आहे. दोघांचं प्रेम इतकं वाढलं की महिलेनं पतीला फसवून भाच्यासोबत पळ काढला.

दिल्लीच्या प्रेमनगर करावल नगर परिसरातील २२ वर्षीय तरुणाचे त्याच्या मामीसोबत प्रेमसंबंध होते. त्याची मामी गौतमबुद्धनगरच्या निक्सन व्हिला बीटा-२ ग्रेटर नोएडा परिसरातील रहिवासी आहे, जिचं लग्न जहांगीराबाद येथील तरुणासोबत झालं होतं. ही महिला काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. तिथून १७ जूनला ती भाच्यासोबत घर सोडून निघून गेली. तिचा शोध घेण्यात अपयश आलेल्या कुटुंबीयांनी २० जूनला गौतमबुद्धनगरच्या बीटा २ पोलीस ठाण्यात तिची हरवल्याची तक्रार दाखल केली.

गौतमबुद्धनगर आणि दिल्ली पोलीस दोघांचा शोध घेत होते. शनिवारी दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली की मामी आणि भाचा बुलंदशहरच्या जुन्या रोडवेज बस स्टँडजवळील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. दिल्ली पोलिसांनी नगर पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान, पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच मामीनं आपल्या प्रियकर भाच्यासोबत विष प्राशन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT